
पुणे : बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय व ससून रुग्णालयातील २०२० बॅचच्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी आजपासून (ता. १५ ) बेमुदत संप पुकारला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून त्यांना मानधन (स्टायपेंड) न मिळाल्याने त्यांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत त्वरित कारवाई न केल्यास रुग्णसेवा बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे.