
पुण्यात बीजे मेडिकल कॉलेजमधील एका २३ वर्षीय विद्यार्थीनीनं वसतीगृहात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडलीय. तरुणीने दिवसभर मैत्रिणींसोबत पार्टी केली. केक कापला. त्यानंतर आईसोबतचा फोटो स्टेटसला ठेवून काही वेळानं गळफास घेतल्यानं खळबळ उडाली आहे. तिच्याकडे सुसाइड नोटही आढळून आली आहे.