मुख्यमंत्र्यांच्या धमक्‍यांना भीत नाही; काय करायचं ते करा : चंद्रकांत पाटील

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 29 November 2020

पाटील म्हणाले," चंपा काय, टरबुज्या काय ही काय भाषा आहे. ही आपली राजकीय संस्कृतीच नाही. आम्ही उद्धव ठाकरेंना 'उठा', अजित पवारांना 'अपा' शरद पवारांना "शपा' आणि जयंत पाटील यांना "जपा' म्हटले तर चालेल. ऍक्‍शन रिक्‍शनच्या खेळात सर्वसामान्य जनता भरडली जात आहे.''

पुणे : "मुख्यमंत्री उद्धव ठाकरे "विरोधकांना बघून घेऊ'ही भाषा वापरत आहेत. ही आपली राजकीय संस्कृती नाही. त्यांच्या धमक्‍यांना आजिबात भीक घालत नाही, तुम्हाला काय करायचं ते करा,' अशा शब्दात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला चॅलेंज दिले. राज्यात ऍक्‍शन-रिऍक्‍शनचा खेळ सुरू असून त्याबाबत सर्वच राजकीय पक्षांनी एकत्र बसून आचारसंहिता ठरविण्याची गरज आहे, असेही ते यावेळी म्हणाले. 

राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्वीनिमित्ति भाजपने राज्यभर पत्रकार परिषदे घेऊन सरकारच्या कारभारावर टिका केली. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत पाटील बोलत होते. यावेळी खासदार गिरीष बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, सभागृह नेते धीरज घाटे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, शहराध्यक्ष जगदिश मुळीक आदी उपस्थित होते.पाटील म्हणाले," चंपा काय, टरबुज्या काय ही काय भाषा आहे. ही आपली राजकीय संस्कृतीच नाही. आम्ही उद्धव ठाकरेंना 'उठा', अजित पवारांना 'अपा' शरद पवारांना "शपा' आणि जयंत पाटील यांना "जपा' म्हटले तर चालेल. ऍक्‍शन रिक्‍शनच्या खेळात सर्वसामान्य जनता भरडली जात आहे.''

निजाम संस्कृतीतून हैदराबादला मुक्त करू- अमित शहा 

हे अनैसर्गिक, अकृत्रिम सरकार स्थापन झाल आहे. परंतु मी स्वत: किंवा देवेंद्र फडणवीस यांनी कधीही हे सरकार येत्या तीन महिन्यात पडेल असा दावा केलेला नाही. ऊलट गेली वर्षभर खुर्चीसाठी धडपडणारे, अपमान गिळून खुर्चीला चिकटणारे सरकार बनले. गेले वर्षभर सत्ता टिकविण्याची धडपड करण्यातचं गेले. सरकार पडण्यापेक्षा त्यांनी सरकार टिकवून चालवून दाखवावं, आम्ही सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करत राहू, असे ही ते म्हणाले. कोरोनाच्या काळात मोठ्या प्रमाणावर भष्ट्राचार झाला असून अधिवेशनात या भष्ट्राचाराचे वागाडे काढले जातील, म्हणून सरकारमध्ये अधिवेशनाला सामोरे जाण्याची हिंमत नाही, हे पूर्णपणे अपयशवी सरकार आहे, असेही ते एका प्रश्‍नाला उत्तर देताना म्हणाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP Chandrakant Patil Attacking political culture of Chief Minister Uddhav Thackeray