esakal | निजाम संस्कृतीतून हैदराबादला मुक्त करू- अमित शहा 
sakal

बोलून बातमी शोधा

amit shah

बृहद हैदराबाद महापालिकेच्या निवडणूक प्रचाराचा भाग म्हणून अमित शहा यांनी आज रोड शो केला.

निजाम संस्कृतीतून हैदराबादला मुक्त करू- अमित शहा 

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

हैदराबाद- ‘‘हैदराबादला आम्हाला आधुनिक शहर बनवायचे आहे. निजामाच्या संस्कृतीतून या शहराला मुक्त करू,’’ असे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री व भाजपचे नेते अमित शहा यांनी आज दिले. बृहद हैदराबाद महापालिकेच्या निवडणूक प्रचाराचा भाग म्हणून अमित शहा यांनी आज रोड शो केला. त्यापूर्वी चार मिनार जवळील भाग्यलक्ष्मी मंदिरात त्यांनी पूजाही केली. त्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी ओवेसींवर टीका केली. महापालिकेसाठी एक डिसेंबरला मदतान होणार आहे, तर चार डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.

हैदराबादचा महापौर यावेळी भाजपचाच असेल. आम्हाला समर्थन दिल्याबद्दल सर्व नागरिकांचे मी आभार मानतो, असे सांगून शहा म्हणाले, ``पंतप्रधानांनी देशभरात लागू केलेली आयुष्यमान भारत योजना राजकीय स्वार्थासाठी हैदराबादमध्ये लागू करण्यात आली नाही. त्यामुळे येथील गरिबांना मोफत उपचार मिळत नाहीत.``
वंशवादाऐवजी लोकशाही येथे आणण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे सांगून शहा म्हणाले, ``केसीआर आणि एमआयएमने गेल्या पाच वर्षांत काही काम केले असेल तर ते जनतेसमोर मांडावे.``

भाजपच्या दिग्गज नेत्यांच्या 'हैदराबाद'मधील फौजफाट्यामागे दडलंय तरी...

त्यांनी एकदा लिहून द्यावे

हैदराबादमध्ये अवैधरीत्या बांगलादेशी आणि रोहिंग्यांचे वास्तव्य असेल तर, अमित शहा कारवाई का करत नाहीत? असा प्रश्न ओवेसींनी विचारला होता. त्याला उत्तर देताना अमित शहा म्हणाले, ``जेव्हा आम्ही संसदेमध्ये कायदा आणतो, तेव्हा सभागृहात गोंधळ घातला जातो. बांगलादेशी रोहिंग्यांना काढून टाका असे ओवेसींनी लिहून द्यावे, मग योग्य ती कारवाई आम्ही करतो``

अमित शहा म्हणाले...

- हैदराबादमध्ये एक मिनी इंडिया वसविण्याचा आमचा प्रयत्न
- भाजप सत्तेवर आल्यास अनधिकृत बांधकामांवर कारवाई
- एमआयएमच्या सहमतीनेच अनधिकृत बांधकामे. त्यामुळेच पावसात शहरात पाणी घुसले
- आयटी क्षेत्रातील गुंतवणुकीचा हैदराबादला फायदा

चंद्रकांत पाटलांचे जिगर मोठे - रोहीत पवार

दरम्यान, तुमची पिढी संपेल पण हैदराबादचे नाव भाग्यनगर होणार नाही, असे प्रत्युत्तर एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी दिले. बृहन् हैदराबाद महापालिका निवडणुकीसाठी प्रचार आता रंगात आला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कालच रोड शो केला होता. त्यावेळी, हैदराबादला भाग्यनगर करण्यासाठी मी आलो आहे, असे वक्तव्य आदित्यनाथ यांनी केले होते. त्याला ओवेसी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. सभेत बोलताना ओवेसी म्हणाले, ``तुमची पिढी संपेल, पण हैदराबादचे नाव बदलले जाणार नाही, कायम राहील. जर तुम्हाला वाटत असेल की शहराचे नाव बदलू नये, तर एमआयएमला मतदान करा.``

“त्यांना सर्व नावे बदलायची आहेत. तुमचे नाव बदलले जाईल, पण हैदराबादचे नाव बदलले जाणार नाही. नवे बदलण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला?,`` असा प्रश्नही ओवेसी यांनी यावेळी उपस्थित केला.


 

loading image