Pune Municipal Corporation : महापौर पदासाठी पुण्यात तिरंगी संघर्ष; भाजप, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारी अर्ज दाखल

Pune mayor election : भाजपने पुणे महापालिका निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा एकहाती सत्ता मिळवल्यानंतर मंजूषा नागपुरे महापौर, परशुराम वाडेकर उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल केले. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही उमेदवार दाखल करीत महापौर, उपमहापौर पदाची तिरंगी लढत निश्चित केली.
Pune Municipal Corporation

Pune Municipal Corporation

sakal

Updated on

पुणे : महापालिका निवडणुकीत भाजपने दुसऱ्यांदा एकहाती सत्ता आणल्यानंतर मंगळवारी भाजपने महापौर, उपमहापौर पदासाठी आपले अर्ज दाखल केले. त्याचवेळी कॉंग्रेस पक्षानेही भाजपला विरोधाची भूमिका कायम ठेवत दोन्ही पदांसाठी आपले उमेदवार दिले. तर, राज्यातील भाजपसमवेत महायुतीमध्ये असणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षानेही ऐनवेळी महापौर, उपमहापौर पदासाठी आपले उमेदवारी अर्ज दाखल करत महापौर, उपमहापौर पदाच्या निवडणुकीत "ट्विस्ट' निर्माण केला आहे. त्यामुळे महापौर, उपमहापौर पदासाठी आता भाजप, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष अशी तिरंगी लढत होण्याची शक्‍यता आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com