

BJP Slams Congress Over Remark on Chhatrapati Shivaji Maharaj
Esakal
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केल्यानं राज्यभरातून निषेध व्यक्त केला जात आहे. भाजपकडून आक्रमक भूमिका घेत थेट काँग्रेस कार्यालयाच्या गेटवर मोर्चा नेण्यात आला आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी अशी मागणी भाजपने केलीय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानासाठी आम्ही इथं आलोय. तुम्ही छत्रपती शिवरायांचे मावळे आहात की टिपू सुलतानची औलाद आहात याचं उत्तर द्या अशा शब्दात भाजपने विचारणा केलीय.