Pune News : प्रदेशाध्यक्षांच्या कार्यक्रमाला भाजप नगरसेवकांची दांडी; बेशिस्त वर्तनामुळे निघणार खरडपट्टी

विधान परिषद निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आलेले असताना या महत्त्वाच्या कार्यक्रमाकडे भाजपच्या अनेक नगरसेवकांनी फिरवली पाठ.
Ravindra Chavan

Ravindra Chavan

ESakal

Updated on: 

पुणे - विधान परिषद निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आलेले असताना या महत्त्वाच्या कार्यक्रमाकडे भाजपच्या अनेक नगरसेवकांनी पाठ फिरवली. काही जण आले आणि तोंड दाखवून काही वेळाने निघून गेल्याचे प्रकार घडले आहेत. याची पक्षाने गंभीर नोंद घेतली असून, पक्ष शिस्तीला फाटा देणाऱ्या नगरसेवकांची खरडपट्टी काढली जाणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com