esakal | भाजपमध्ये आलेल्यांचीही ईडीकडून चौकशी होऊ शकते - चंद्रकांत पाटील
sakal

बोलून बातमी शोधा

Chandrakant-Patil

पुणे डीजेमुक्‍त करणार
गणेश मंडळांनी डीजे लावू नयेत, यासाठी पोलिस प्रशासनाकडून प्रबोधन करण्यात येत आहे. डेसिबल मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई न केल्यास पोलिसांवरच गुन्हे दाखल होतील. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर गुन्हे दाखल करण्यात येतील, असे पालकमंत्री पाटील यांनी स्पष्ट केले. कोल्हापूर शहर डीजेमुक्‍त झाले आहे. त्या धर्तीवर पुणे शहरही डीजेमुक्‍त होईल, असे त्यांनी नमूद केले.

भाजपमध्ये आलेल्यांचीही ईडीकडून चौकशी होऊ शकते - चंद्रकांत पाटील

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा
पुणे - सक्त वसुली संचालनालय (ईडी) ही स्वायत्त संस्था असून, त्यांना आवश्‍यकता वाटल्यास भाजपमध्ये प्रवेश केलेल्यांचीही चौकशी होऊ शकते, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

पाटील म्हणाले, 'आपल्या देशात लष्कर, निवडणूक आयोग, न्यायालय, आयकर विभाग अशा काही संस्था स्वायत्त आहेत. ईडी विभागाकडून लगेचच कोणाचीही चौकशी होत नाही. दोन- दोन वर्षांपासून रेकी केली जाते. आयकर विभागाला एखाद्या ठिकाणी छापा टाकण्यासाठी तीन- तीन वर्षे रेकी करावी लागते. ते इतके सोपे नसते. कोणाच्याबाबत राजकीय मतभेदातून राग आला की लगेच ईडीमार्फत चौकशी होते, असे होत नाही. भाजपमध्ये आल्यानंतरसुद्धा ईडीने ठरविले तर चौकशी होईल.''

पुणे डीजेमुक्‍त करणार
गणेश मंडळांनी डीजे लावू नयेत, यासाठी पोलिस प्रशासनाकडून प्रबोधन करण्यात येत आहे. डेसिबल मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई न केल्यास पोलिसांवरच गुन्हे दाखल होतील. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर गुन्हे दाखल करण्यात येतील, असे पालकमंत्री पाटील यांनी स्पष्ट केले. कोल्हापूर शहर डीजेमुक्‍त झाले आहे. त्या धर्तीवर पुणे शहरही डीजेमुक्‍त होईल, असे त्यांनी नमूद केले.
loading image
go to top