esakal | अन् मेधा कुलकर्णी म्हणतात, आज फिर दिल को हमने समझाया...
sakal

बोलून बातमी शोधा

Medha Kulkarni, BJP, Pune

पुणे: राज्यात होणाऱ्या आगामी विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमधील अंतर्गत नाराजीचे पुन्हा एकदा दर्शन घडत आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारांची निवड करताना भाजपने ज्येष्ठ आणि निष्ठावंत नेत्यांना पुन्हा डावलल्याची चर्चा सुरु आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्याच्या माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेनी आपली नाराजी स्पष्टपणे व्यक्त केली आहे. त्यांच्याशिवाय भाजपच्या कोथरुड मतदार संघातील (Kothrud Constituency) माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी देखील सूचक ट्विट करत आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. 

अन् मेधा कुलकर्णी म्हणतात, आज फिर दिल को हमने समझाया...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे: राज्यात होणाऱ्या आगामी विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमधील अंतर्गत नाराजीचे पुन्हा एकदा दर्शन घडत आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारांची निवड करताना भाजपने ज्येष्ठ आणि निष्ठावंत नेत्यांना पुन्हा डावलल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगताना दिसते. सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्याच्या माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेनी आपली नाराजी स्पष्टपणे व्यक्त केली आहे. त्यांच्याशिवाय भाजपच्या कोथरुड मतदार संघातील (Kothrud Constituency) माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी देखील सूचक ट्विट करत आपल्या मनातील भावना व्यक्त केली आहे. 

कन्टेन्मेंट झोनमध्ये 10 ते 17 मेपर्यंत लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी : अजित पवार

Medha Kulkarni यांनी शुक्रवारी रात्री उशीराने ट्विटरच्या माध्यमातून एक पोस्ट शेअर केली आहे. पक्षाचे चिन्ह असलेल्या कमळासह एक शेर लिहून त्यांनी सूचकपद्धतीने आपली नाराजी व्यक्त केल्याचे दिसते. 'आज फिर दिल ने एक तमन्ना की... आज फिर दिल को हमने समझाया...' या शायरीतून त्यांनी मनातील खदखद व्यक्त केली आहे. 

मेधा कुलकर्णी या कोथरूड मतदारसंघाच्या माजी आमदार आहेत. २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी भाजपने मेधा कुलकर्णी यांच्या जागी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना कोथरूडमधून उमेदवारी दिली होती. यावेळी स्थानिक पातळीवर नाराजीचे वातावरण निर्माण झाल्याचेही पाहायला मिळाले होते. पक्ष नेतृत्वाच्या आदेशामुळे मेधा कुलकर्णी यांना निवडणूकीतून माघार घ्यावी लागली होती.

राज्यात लॉकडाउन वाढवण्याबद्दल मुख्यमंत्री म्हणाले,...

विधानसभेच्या निवडणुकीच्या काळात भाजप सर्वश्रेष्ठींच्या निर्णयानंतरही चंद्रकांत पाटील यांच्या प्रचारसभेतील भाषणातून त्यांच्या मनातील दु:ख समोर आल्याचे पाहायला मिळाले होते.  घराघरात काँग्रेसचे फोटो असल्याच्या काळापासून मी आपल्या पक्षासाठी काम करत आहे. खंजीर खुपसलात तरी पक्षाशी एकनिष्ट राहिल, अशा भावनिक शब्दांत मेधा कुलकर्णी यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना समर्थन असल्याचे म्हटले होते. एवढेच नाही तर  माझ्या जिव्हाळ्याची माणसं तुम्हाला विक्रमी मतांनी निवडून आणतील, असा विश्वासही व्यक्त केला होता. Pune कोथरुड मतदार संघातून चंद्रकांत पाटील निवडूनही आले.

विधानसभेदरम्या घडलेल्या प्रकारानंतर विधानपरिषदेच्या निवडणुकीत न्याय मिळेल, अशी भावना मेधा कुलकर्णी यांच्या मनात होती. मात्र त्यांचा पुन्हा भ्रमनिरास झाला, अशा आशयानेच त्यांनी आपली नाराजी व्यक्त केल्याचे दिसते. विधानसेभेची उमेदवारीला कात्री लावल्यानंतर पक्षासोबत कायम राहिल असे सांगणाऱ्या मेधा कुलकर्णी यांनी सूचक ट्विटमधून पदरी निराशा आल्यानंतर पुन्हा स्वत:च्या मनाला समजावले, अशी भावना व्यक्त केली आहे.    

पोलिसांचा खबरी असल्याचा संशय; मग पत्रकाराला

माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी देखील ट्विटच्या माध्यमातून विधानपरिषदेची उमेदवारी न मिळाल्याची खंत व्यक्त केली आहे. आईंना,ताईंना फोन करून दुःख व्यक्त करताय ठीक आहे पण वाघांनो असं रडताय काय मी आहे ना, 'तुमच्यासाठी मी आणि माझ्यासाठी तुम्ही' बस साहेबांचे आशिर्वाद आहेत दिवसभर फोन उचलले नाही कुणाकुणाला उत्तर देऊ? या निर्णयाचा मला धक्का अजिबात बसला नाही. भाजपच्या त्या चार ही उमेदवारांना आशिर्वाद! असे ट्विट पंकजा मुंडे यांनी केले आहे. रणजितसिंह मोहिते-पाटील आणि गोपीचंद पडळकर या अलीकडेच पक्षात आलेल्या नेत्यांना भाजपने विधान परिषदेची उमेदवारी दिली आहे. त्यासोबतच प्रविण दडके आणि डॉ अजित गोपछडे या दोन नेत्यांचाही समावेश आहे.  

loading image