भाजपच्या हातून सत्ता गेल्याने पुणे महापालिकेतही 'हे' मोठे बदल

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 नोव्हेंबर 2019

राज्यातील सत्तांतरानंतर महापालिकेतील पदाधिकारी बदलणयाचा निर्णय सत्ताधारी भाजपने घेतला असून, महापालिकेतील सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समिती अध्यक्ष सुनिल कांबळे आणि ‘पीएमप’ संचालक सिद्धर्थ शिरोळे यांना राजीनामा देण्याचा आदेश पक्षाने दिला आहे. 

पुणे : राज्यातील सत्तांतरानंतर महापालिकेतील पदाधिकारी बदलणयाचा निर्णय सत्ताधारी भाजपने घेतला असून, महापालिकेतील सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समिती अध्यक्ष सुनिल कांबळे आणि ‘पीएमप’ संचालक सिद्धर्थ शिरोळे यांना राजीनामा देण्याचा आदेश पक्षाने दिला आहे. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

महापालिकेत 2017मध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर सभागृहनेतेपदाची जबाबदारी भिमाले यांच्याकडे सोपविली होती. ते पावणेतीन वर्ष या पदावर आहे. तर, कांबळे हे विधानसभा निवडणुकीत कॅन्टोमेंट मतदारसंघातूनही निवडून आले आहेत, तर शिरोळेही आमदार झाले आहे. 

Image result for siddhartha shirole

राज्यात आजपासून उद्धव सरकार  

Image result for sunil kamble

विधानसभा निवडणुकीत पडझड झाल्याने पदाधिकारी बदलणयाचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. भाजपच्या शहराध्यक्ष माधुरी मिसाळ म्हणाल्या, ‘सभागृहनेते, स्थायीचे अध्यक्ष आणि पीएमपीच संचालकांना राजीनामे देण्यास सांगितले आहे.नवे पदाधिकारी लवकरच निवडले जातील.’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bjp have changed their main post in Pune MC