Pune : बारामतीत असे किती आले आणि गेले ; अजित पवार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit Pawar NCP

Pune : बारामतीत असे किती आले आणि गेले; अजित पवार

पुणे : महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अखिल मंडई मंडळाला आज भेट दिली यावेळी भाजपला टोला हाणला. बारामतीत किती जण आले किती जण गेले खूप लाटा मी बारामतीत पाहिल्या आहेत बारामती मधल्या लोकांना माहिती आहे की कुठले बटन दाबायचे आहे खडे बोल विरोधकांना सुचवले. भाजपचे आजकाल खूप लक्ष घालत आहे बारामती मध्ये या प्रश्नाला उत्तर देताना पवार यांनी हे मत व्यक्त केले.

३१ तारखेला बाप्पा आपल्याकडे आले आज पर्यंत सगळे कार्यक्रम चांगले पार पडले आहेत. आज विसर्जन मिरवणूक निघते २ वर्ष कोविडमुळे २ वर्ष मिरवणूक घेता आली नव्हती. त्यामुळे अतिशय आनंदाने उत्साहाने हा उत्सव पार पडत आहे.

सगळ्या गणेश भक्तांनी काळजी घ्यावी की कुठला ही अनुचित प्रकार घडू नये. पोलिस त्यांचे काम करतीलच पण गणेश मंडळांनी देखील काळजी घ्यायला हवी असे दादांनी मत व्यक्त केले. महात्मा फुले मंडईतील टिळक पुतळ्याचेही पवार यांनी पुष्पहार घालून दर्शन घेतले. यावेळी उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार गिरीश बापट, काँग्रेसचे नेते मोहन जोशी, भाजपचे शहराध्यक्ष मुळीक हेही यावेळी उपस्थित होते. यावेळी पवार यांनी मानाच्या पाच गणपतीचे दर्शन घेतले.

Web Title: Bjp Leader Amit Shah Baramati Election Opposition Leader Ajit Pawar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..