esakal | आमदार चंद्रकांत पाटील यांचे रोहित पवारांना 'शाब्दिक टोले'
sakal

बोलून बातमी शोधा

bjp leader chandrakant patil reaction on mla rohit pawar tweet

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे पंतप्रधान मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका केली आहे. त्यावर चंद्रकांत पाटील यांना विचारण्यात आले.

आमदार चंद्रकांत पाटील यांचे रोहित पवारांना 'शाब्दिक टोले'

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

पुणे : राज्य सरकारच्या कामावर आज भाजपचे BJP त्यांनी केली. पुण्यात एका कार्यक्रमानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे NCP आमदार रोहित पवार यांनाही लक्ष्य केले. मराठा समाजातील तरुण-तरुणी अस्वस्थ आहेत हे मान्य आहे. पण, सरकारने वेळेत परीक्षा पुढे ढकलायला हव्या होत्या, असंही पाटील म्हणाले. 

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

राज्य सरकारवर टीका
चंद्रकांत पाटील म्हणाले, 'हे सरकार दिशाहीन आहे. एमपीएमसीच्या परीक्षा पुढे ढकलायच्या होत्या तर, आधी निर्णय घ्यायला हवा होता. पण, सरकारमध्ये  कोणीही निर्णयाची जबाबदारी घेत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तर, मातोश्रीवर बसून आहेत.' सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाला स्थगिती मिळवूनही सरकार महिना उलटून गेला आहे, समाजाला न्याय मिळण्यासाठी सरकार काय करणार आहे, असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी यावेळी उपस्थित केला. सरकारने कोरोनाचे कारण सांगत. परीक्षा पुढे ढकलली. आता कोरोना नियंत्रणात येत आहे. त्यामुळं मराठा आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टाचा निकाल येण्यापूर्वी तुम्ही एमपीएससीची परीक्षा घेणार का? असा प्रश्न आहे. त्यामुळं सरकारमध्ये कशाचा कशाला ताळमेळ नाही, असं परखड मत पाटील यांनी यावेळी व्यक्त केलं. 

मुंबईतील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

रोहित पवारांना टोला
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे पंतप्रधान मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका केली आहे. त्यावर चंद्रकांत पाटील यांना विचारण्यात आले. त्यावर पाटील यांनी रोहित पवार यांना शाब्दिक टोले लगावले आहेत. ते म्हणाले, 'काही जणांना मोठ्या माणसांवर टीका केल्याशिवाय प्रसिद्धी मिळत नाही. तुम्ही मीडियाने त्यांना सांगायला हवे की, आम्ही तुम्हाला तसेही कव्हरेज देऊ. मग, ते टीका करणं बंद करतील.' भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी निवडणुकांबाबत केलेले विधान नजीकच्या काळातले नाही. जेव्हा निवडणुका येतील तेव्हा भाजपची सत्ता येईल असा त्यांच्या विधानाचा अर्थ होता, असे स्पष्टीकरणही पाटील यांनी दिले.

काय म्हणाले चंद्रकांत पाटील?

  • राज्यात दिशाहीन सरकार सत्तेवर आहे 
  • एमपीएससीच्या परीक्षा वेळेत पुढं ढकलायला हव्या होत्या
  • 11 तारखेला परीक्षा आणि 9 तारखेला परीक्षेबाबत निर्णय हे बरोबर नाही
  • राज्य सरकारमध्ये कशाचा कशाला ताळमेळ नाही
  • सरकार शेतकऱ्यांच्या संस्थांबद्दल गंभीर नाही, महिला सुरक्षेवर गंभीर नाही