Loksabha 2019 : समतोल विकासासाठी बारामतीमध्ये परिवर्तन घडवा : चंद्रकांत पाटील 

प्रशांत चवरे
सोमवार, 1 एप्रिल 2019

भिगवण : नरेंद्र मोदींनी गरिबांना पंधरा लाख देऊ असे कधीच म्हटले नव्हते परंतु मोदी सरकारने आयुष्यमान भारत योजनेतुन प्रत्येक कुटुंबासाठी पाच वर्षात पंचवीस लाख रुपयांची तरतुद केली आहे. 52 लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा, मराठा आरक्षण, धनगर समाजाला आदिवासींच्या सवलती अशी भरीव  कामगिरी केली आहे. केंद्रात भाजपचे सरकार पुन्हा स्थापन करण्यासाठी व समतोल विकासासाठी बारामतीमध्ये परिवर्तन घडवा असे आवाहन राज्याचे महसुलमंत्री चंद्रकात पाटील यांनी केले.

बारामती लोकसभा मतदार संघातील भाजप-शिवसेना व मित्रपक्षाच्या उमेद्वार कांचन राहुल कुल यांचे प्रचारार्थ मदनवाडी (ता. इंदापुर) येथील व्यंकटेश लॉन्स येथे आयोजित जाहिर सभेमध्ये ते बोलत होते. भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार बाळा भेगडे, आमदार राहुल कूल, आमदार योगेश टिळेकर, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र काळे, वासुदेव काळे, पृथ्वीराज जाचक, मारुती वणवे, अशोक वणवे, प्रशांत सातव, नानासाहेब शेंडे, माऊली चवरे, बाळासाहेब गावडे, तानाजी दिवेकर, रामचंद्र निंबाळकर उपस्थित होते. ज्यांनी कधी ग्रामपंचायत निवडणुक लढविली नाही अशा नातवाला राष्ट्रवादीने खासदारकिची उमेद्वारी दिली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसला विकासाचे देणे घेणे नाही त्यांना केवळ घराणेशाही पुढे चालवायची आहे अशी  टिका चंद्रकांत पाटील यांनी केली. 

लोकसभेच्या उमेद्वार कांचन कुल म्हणाल्या, बारामती लोकसभा मतदार संघाच्या काही भागाचा विकास तर काही भाग हा कायमचा भकास अशी स्थिती आहे. माझ्या नवखेपणाबद्दल विरोधक बोलत आहेत परंतु कुल कुटुंबिय मागील चाळीस वर्षापासुन राजकारण व समाजकारणांमध्ये आहे. कुल कुटुंबाने दौंड तालुक्याचा कायापालक केला आहे संधी मिळाल्यास बारामती लोकसभा मतदार संघाचा समतोल विकास साधु. यावेळी आमदार राहुल कूल, आमदार बाळा भेगडे, राजेंद्र काळे, किरण गोफणे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक भजनदास पवार सुत्रसंचालन बाळासाहेब पानसरे आभार अशोक वणवे यांनी मानले. कार्यक्रमाचे नियोजन माऊली मारकड, तेजस देवकाते, अशोक पाचांगणे, संदीप खुटाळे, माऊली मारकड, राजेंद्र जमदाडे यांनी केले.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP Leader chandrakant patil speaks at bhigwan