राज्य सरकार साप समजून भुई धोपडतयं; चंद्रकांत पाटील यांचा टोला

अश्विनी जाधव
Saturday, 25 July 2020

आम्ही कधी गमतीनेही सरकार पाडण्याचा उल्लेख केला नाही. ज्येष्ठ नेते शरद पवार आणि मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे यांनी फक्त संजय राऊत यांना सामनाासाठीच मुलाखती दिल्या. मुळात आम्ही सरकार पडण्याचा प्रश्नच नाही.
- चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष भाजप

पुणे : राज्य सरकार पाडण्याचा प्रयत्न आम्ही करत नाही, असा पुनरुच्चार भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा केलाय. सरकारमधील तिन्ही पक्ष, कार्यकर्त्यांना धीर देत आहेत, बाकी काही नाही, असा टोलाही चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांना लगावला आहे. पुण्यात आज, चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

चंद्रकांत पाटील म्हणाले, 'आम्ही कधी गमतीनेही सरकार पाडण्याचा उल्लेख केला नाही. ज्येष्ठ नेते शरद पवार आणि मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे यांनी फक्त संजय राऊत यांना सामनाासाठीच मुलाखती दिल्या. मुळात आम्ही सरकार पडण्याचा प्रश्नच नाही. तरी पण ते सारखे सारखे का सांगताहेत की, हिम्मत असेल तर सरकार पाडून दाखवा. ते त्यांच्या कार्यकर्त्यांना धीर देताहेत, बाकी काही नाही. साप समजून भुई धोपटत आहेत.' मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी जिल्हे वाटून घेतले का? उद्धव ठाकरे मुंबईचे मुख्यमंत्री आणि अजित पवार पुण्याचे मुख्यमंत्री, असा सवाल पाटील यांनी केलाय.

आणखी वाचा - पुण्यात रेड लाईट एरियातही घुसला कोरोना!

अजित पवार सकाळी 7 वाजता काम करू शकतात. त्यांचं कौतुक आहे. मुख्यमंत्री पुण्याकडे दुर्लक्ष करून, अजित पवार पुण्यात कसे अपयशी ठरले अस दाखवण्याचा तर प्रयत्न नाही ना? असा सवालही चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला. चंद्रकांत पाटील म्हणाले, 'कोरोनाच्या काळात राजकारण करू नका, असं सरकारमधील नेते सातत्यानं म्हणत आहेत. कोरोनाचा कहर सुरू असताना उपाययोजना राबवण्यात सरकार कमी पडतेय. त्याविषयी बोललो आणि त्याला राजकारण म्हणणार असाल तर, आम्ही ते करणार.'  लॉकडाउन संदर्भात चंद्रकांत पाटील म्हणाले, 'लॉकडाउन हे उत्तर नाही, सुविधा वाढवणे हे उत्तर आहे. पुणे महापालिकेने खर्च केला. राज्य सरकारने एक रुपया तरी दिला का ?मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आढावा बैठक घेऊन पुणेकरांना आश्वस्त करणार की, सर्व अजित पवारांवर सोडणार?'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bjp leader chandrakant patil statement maha vikas aghadi maharashtra