Video:कोरेगाव-भीमाप्रकरणी चंद्रकांत पाटील यांचं मोठ वक्तव्य; राज्य सरकारला दिलं आव्हान

टीम ई-सकाळ
शनिवार, 25 जानेवारी 2020

सरकार रोज नवीन काही तरी बाहेर काढत आहे. माञ, सरकार त्याचा शोध लावत नाही. हा सगळा कल्पनाविलास आहे.
चंद्रकांत पाटील, भाजप अध्यक्ष 

पुणे : कोरेगाव-भीमाप्रकरण, फोन टॅपिंग हा सगळा कल्पनाविलास आहे. त्यामुळं या सगळ्याची लवकरात लवकर चौकशी करून अहवाल द्या, असं आव्हान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारला दिलंय. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आज, पुणे दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला आणि राज ठाकरे यांनी स्वीकारलेल्या हिंदुत्वाच्या भूमिकेचं चंद्रकांत पाटील यांनी स्वागत केलंय.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

काय म्हणाले चंद्रकांत पाटील?
चंद्रकांत पाटील म्हणाले, 'सरकार रोज नवीन काही तरी बाहेर काढत आहे. माञ, सरकार त्याचा शोध लावत नाही. हा सगळा कल्पनाविलास आहे. शिवस्मारकावरही कॅगन ठपका ठेवला आहे. तर त्याची चौकशी का सुरू होत नाही. चौकशीच्या नावाखाली स्मारकाचं काम थांबवू नका. चौकशी सुरू करा,  दोषींवर कारवाई करा. एनआयए तपासावरूनही टीका सुरू आहे. पण, केंद्राला चौकशीचे पूर्ण अधिकार आहेत.' फडणवीस सरकारमध्ये राज्यमंत्री होतो तरी, मला अधिकार नव्हते असं वक्तव्य माजी मंत्री दीपक केसरकर यांनी केलं होतं. त्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, 'केसरकर काय म्हणाले माहिती नाही. पण, राज्यमंत्र्यांनाही अधिकार असतात.'

पुण्याच्या बातम्यांसाठी येथे ► क्लिक करा

राज यांच्या भूमिकेच स्वागत
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदुत्वाची भूमिका घेतली आहे. त्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, 'राज ठाकरे यांनी हिंदुत्वाची कास धरली आहे याचा आम्हाला आनंद आहे. पण, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भविष्यात एकत्र येईल का नाही हे भविष्य ठरवेल. तत्पूर्वी, राज ठाकरे यांना परप्रांतीय विरोधी भूमिका बदलावी लागेल.'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bjp leader chandrakant patil statement on nia investigation bhima koregaon