भाजपा सर्व निवडणुका संपूर्ण ताकदीने लढविणार : हर्षवर्धन पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Harshvardhan patil press Confernce

पुणे : भाजपा सर्व निवडणुका संपूर्ण ताकदीने लढविणार : हर्षवर्धन पाटील

इंदापूर - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजपा संपूर्ण ताकदीने लढविणार असून या निवडणुकीत सक्षम उमेदवार दिला जाईल. या निवडणुकात भाजपास सुवर्णअक्षराच्या काळ आहे. त्यामुळे सर्वांनी संपूर्ण ताकद या निवडणुकांमध्ये लावणे गरजेचे आहे. महविकास आघाडीच्या माध्यमातून रोज कोट्यावधी रुपयांच्या निधीची घोषणा गावो गावी केली जाते. त्याचे सोशल ऑडिट करावे, अशी मागणी भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी केली.

येथील राधिका रेसीडेन्सी क्लबमध्ये तालुका भाजपच्यावतीने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तत्पूर्वी भाजपच्या ६२ लोकांची कार्यकारिणी, ७ मोर्चे, २२ आघाडी, असे एकूण १३०० लोकांना पदनियुक्ती पत्र देवून त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नीरा भीमा कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालकविलास वाघमोडे, इंदापूर अर्बन बँकेचे संचालक अशोक शिंदे, बाबामहाराज खारतोडे, माऊली चवरे, अरविंद जगताप, अंकुश पाडूळे उपस्थित होते. यावेळी ओबीसींना आरक्षण देण्यासअपयशआल्या बद्दल तसेच केंद्र सरकारच्या योजनेची उद्घाटन करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला.

श्री. पाटील पुढे म्हणाले, राज्यसरकार ओबीसी आरक्षण देवू शकले नाही मात्र भाजपने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत मुंबई येथेझालेल्याबैठकीत २७ टक्के जागा ओबीसींना देण्याचा निर्णय करून त्यांना न्याय दिला आहे. आगामी सर्व निवडणुकीत पक्षाची ध्येयधोरणे, झालेली कामे गाव तिथे भाजप शाखेच्या माध्यमातून घरोघरीपोहोचविण्यास प्राधान्य देत आहोत. जगात सर्वात जास्त सदस्य संख्या असलेला हा पक्ष असून पक्षाचे पंतप्रधान,अनेक राज्यात मुख्यमंत्री आहेत. सर्वाधिक खासदार व आमदार आहेत. हा पक्ष जातीयवादी आहे असे म्हणून स्वतःची पोळी भाजून घेणाऱ्या पक्ष व नेत्यांची त्यांनी खिल्ली उडविली. तालुक्यात नीरा भीमा कारखान्यात मुस्लिम महिला संचालिका असून १४१ मुस्लिम व इतर लोक विविध संस्थेत काम करत आहेत. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा लवकरच राज्यास भेट देणार असून सहकार चळवळ सक्षमीकरण करण्यास त्यामुळे चालना मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.