Chandni Chowk Flyover : काल नाराजी, आज हजेरी! लोकार्पण कार्यक्रमात मेधा कुलकर्णी व्यासपीठावर पहिल्या रांगेत

bjp leader medha kulkarni attend chandni chowk flyover inauguration Programme
bjp leader medha kulkarni attend chandni chowk flyover inauguration Programme

पुण्यातील चांदणी चौक येथील पुलाचं लोकार्पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज (१२ ऑगस्ट) पार पडलं. दरम्यान या लोकार्पण सोहळ्यात एक वेगळचं नाराजीनाट्य पाहयला मिळालं. या लोकार्पण कार्यक्रमापूर्वी भाजपमधील गटबाजी उफाळून आल्याचं पाहायला मिळालं.

कोथरुडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी यासंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट लिहिल्याने चर्चांना उधाण आले होते. "असं निष्ठावंतांचं डावललेलं जिणं" अशा आशयाची पोस्ट मेधा कुलकर्णी यांनी केली होती. या पोस्टमध्ये मेधा कुलकर्णी यांनी त्यांच्या मनातील नाराजी उघडपणे बोलून दाखवली होती. मात्र आजच्या चांदणी चौकातील उड्डाण पुलाच्या लोकार्पण कार्यक्रमाला मेधा कुलकर्णी उपस्थित राहिल्याचे पाहायाला मिळालं. यानंतर त्यांची नाराजी दूर करण्यात आली का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

bjp leader medha kulkarni attend chandni chowk flyover inauguration Programme Nitin Gadkari
bjp leader medha kulkarni attend chandni chowk flyover inauguration Programme Nitin Gadkari
bjp leader medha kulkarni attend chandni chowk flyover inauguration Programme
MPSC Exam Fees News : रोहित पवारांची फडणवीसांकडे मागणी, अजितदादांनी केली पूर्ण; दिल्या महत्वाच्या सूचना

मेधा कुलकर्णीं काय म्हणाल्या?

'असं निष्ठावंतांचं डावललेलं जिणं'

"माझ्यावरील कुरघोडया, डावलणं याबद्दल मी कधी जाहीर वाच्यता केली नव्हती. विश्वासात न घेता अचानक निर्णय घेतले तेव्हाही... पण आता दुःख मावत नाही मनात... वाटलं बोलावं तुमच्याशी. चांदणी चौक उद्घाटन कार्यक्रमाची कोथरूडमधील पत्रकं पहिली आणि खूप वाईट वाटलं.

चांदणी चौक या विषयाचं सर्वस्वी श्रेय नितीन गडकरीजी आणि देवेंद्र फडणवीस यांना आहे. पण मुळातच त्यांच्याकडे हा विषय नेला कोणी? स्वतः आदरणीय गडकरीजी काही वर्षांपूर्वी एका कार्यक्रमात जाहीर भाषणात म्हणाले की, "तत्कालीन आमदार मेधा कुलकर्णी ताईंच्या सांगण्यावरून मी हा मुद्दा घेतला"

"अनेक असे संदर्भ देता येतील की ज्यात 'कोथरूड'चे आधुनिक कुठलेच नेते या विषयी सहभागी नव्हते, तेव्हापासून मी सतत पाठपुरावा केला होता. आता मात्र सर्व श्रेय एकट्याचंच असल्यासारखं वागणारे कोथरूडचे सध्याचे नेते... माझ्या सारख्यांचं अस्तित्वच मिटवून टाकण्याच्या प्रयत्नात आहेत का? मध्यंतरी आदरणीय मोदीजी, आदरणीय अमित शाहजी पुण्यात येऊन गेले.

ठराविक लोकांना प्रोटोकॉल सोडून 'सर्व ठिकाणी'चे पास होते. मी राष्ट्रीय पदावर असून, विनंती करूनही मला पास दिला नाही. साधे कोथरूडच्या मंडल अध्यक्षपदाच्या प्रक्रियेतही समाविष्ट श्रेणीत मी अपेक्षित नसेन तर याचा अर्थ स्थानिकांना मी नको आहे. गेली अनेक वर्षे मी हे सहन करीत आहे. त्या त्या वेळी गोष्टी वरिष्ठांपुढे मांडल्या आहेत." असे कुलकर्णी म्हणाल्या.

bjp leader medha kulkarni attend chandni chowk flyover inauguration Programme
Chandni Chowk Inauguration: ना मंत्री, ना आमदार चांदणी चौक उड्डाणपूलाचे श्रेय जाते 'मुख्यमंत्र्यांना'; ट्रॅफिकमध्ये फसले अन्...

आता असह्य होऊ गेलं

"देशापुढील आव्हाने, त्यासाठी करायचे अपेक्षित संघटन सोडून तसेच मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी एकदिलानं कार्य करायचं सोडून, हे स्वतःच्या स्वार्थासाठी विघटनाचं, काटाकाटीचं राजकारण करत आहेत. माझ्या सारख्या निष्ठावान कार्यकर्तीला जाणीव झाली की माझी काही किंमत नाही आहे.

माझ्याबाबत त्यांना असं करणं सोपं जातं. माझ्याकडं ना मसल पॉवर, ना मनी पॉवर. मी एका सामान्य कुटुंबातून आलेली, विचारधारा घरून निष्ठेनं काम करणारी कार्यकर्ती आहे. एका वैचारिकतेतून राजकारणात प्रवेश केला आणि अगदी मनापासून सर्व समाजातील लोकांची कामे केली. आजही जे सोपवले आहे ते करीतच आहे. त्यावर असा बोळा फिरवला जातो आहे हे आता मात्र असह्य होऊन गेलं आहे."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com