
Ravindra Chavan
sakal
पुणे : पूरग्रस्त नागरिक व शेतकऱ्यांना मदत करणे ही सरकारची प्रथम जबाबदारी आहे. सरकार हे पालकाप्रमाणे ठामपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे. केंद्र सरकारकडूनही लवकरच पूरग्रस्तांना मदत मिळणार आहे,’’ असे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.