"बारामती पॅटर्न'च्या विरोधात भाजपने थोपटले दंड 

मिलिंद संगई  
Monday, 27 April 2020

"बारामती पॅटर्न'च्या संदर्भात भाजप नेत्यांनी अनेक आरोप कर या प्रणालीमध्ये आमूलाग्र बदल करण्याची गरज बोलून दाखवली.

बारामती (पुणे) : कोरोना मुक्तीसाठी राबविलेला "बारामती पॅटर्न' हा नियोजनशून्य असून, त्यात तातडीने सुधारणा केली पाहिजे, अशी अपेक्षा भाजपचे नेते प्रशांत नाना सातव, नगरसेवक सुनील सस्ते, भाजपचे शहराध्यक्ष सतीश फाळके, भाजपचे तालुकाध्यक्ष पांडुरंग कचरे यांनी बोलून दाखवली. 

बारामतीत सोमवारी (ता. 27) झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी "बारामती पॅटर्न'च्या संदर्भात अनेक आरोप करत या प्रणालीमध्ये आमूलाग्र बदल करण्याची गरज बोलून दाखवली. त्यांनी सांगितले की, पोलिस, महसूल व आरोग्य विभागाचे कर्मचारी आणि स्वयंसेवक यांची नियमित आरोग्य तपासणी होत नाही. काही ठराविक संस्थांनाच "बारामती पॅटर्न'मध्ये सहभागी करून घेण्यात आले आहे. घरपोच वस्तू देण्यासाठी आखलेल्या योजनेला अपयश आले आहे. यामध्ये देखील पक्षपातीपणा करण्यात आला आहे. 

पुण्याच्या इतर बातम्या सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा

ही वेळ कसल्याही प्रकारचे राजकारण करण्याची नाही, याची आम्हाला ही कल्पना आहे. मात्र, "बारामती पॅटर्न'च्या नावाखाली जर शेतकऱ्यांवर अन्याय होणार असेल; तर आम्ही आंदोलन करू, असा इशारा या वेळी देण्यात आला. 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP leaders oppose Baramati pattern