Maharashtra Politics: शिंदे गटातील माजी खासदाराला डच्चू? केंद्रीय मंत्र्यांच्या विधानानं भुवया उंचावल्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Maharashtra Politics: शिंदे गटातील माजी खासदाराला डच्चू? केंद्रीय मंत्र्यांच्या विधानानं भुवया उंचावल्या

Maharashtra Politics: शिंदे गटातील माजी खासदाराला डच्चू? केंद्रीय मंत्र्यांच्या विधानानं भुवया उंचावल्या

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी चढाओढ दिसून येत आहे. अशाच परिस्थितीत शिंदे गटातील आणखी एका समर्थकांच्या जागेवर भाजपने दूसरा उमेदवार उभा करणार असल्याचं सांगितलं आहे. पुण्यातील शिरूर लोकसभा जिंकण्यासाठी भाजपने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. यासाठी केंद्रीय मंत्री रेणूका सिंह सध्या शिरूर मतदार संघाचा तीन दिवसीय दौरा करत आहेत. केंद्रीय मंत्री रेणूका सिंह यांनी या दौऱ्यामागचा उद्देश सांगत मोठा खुलासा केला. शिरुर लोकसभा मतदारसंघात भाजपची ताकत वाढवण्यासाठी केंद्राने माझ्यावर जबादारी दिली असून त्यासाठी मी या मतदारसंघात आली आहे, अशी प्रतिक्रिया भाजपच्या केंद्रीय नेत्या रेणूका सिंह यांनी दिली.

यासंदर्भात बोलताना भाजपच्या केंद्रीय मंत्री रेणूका सिंह म्हणाल्या, स्थानिक माजी खासदार आमच्या पक्षासोबत युतीत होते, तेव्हा त्यांना उमेदवारी दिली होती. पण, आता दिवस बदलले आहेत. आम्ही आमची ताकत आजमावनार आहोत. आता माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या उमेदवारीच्या चर्चेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.

रेणूका सिंह यांचा शिरुर मतदारसंघात तीन दिवसीय दौरा आयोजित करण्यात आला आहे. बुधवारी मंचर येथे आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांकडून विचारण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर देताना त्या बोलत होत्या. शिरूरचे स्थानिक आणि माजी खासदार शिवाजी आढळराव सध्या शिंदे गटात आहेत. त्यातच आता शिंदे गट आणि भाजप यांची युती असताना भाजपकडून शिरुरमध्ये लोकसभेसाठी उमेदवार देणार का? या प्रश्नावर रेणूक सिंह यांनी हे उत्तर दिले आहे.

सध्या शिंदे गटात असलेले आणि शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील शिरूर मतदासंघातून उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. पण, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिरूर मतदारसंघ राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांच्यासाठी सोडणार होते. या कारणास्तव शिवाजी आढळर पाटलांनी शिंदे गटाशी हातमिळवणी केली असल्याचे बोलले हाते. अशातच भाजपनेही शिरूर मतदारसंघात आपला उमेदवार देण्याची तयारी केल्याने शिवाजीराव आढळराव पाटील यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

Web Title: Bjp May Give Their Candidate Instead Of Shivajiraon Aadhalrao Patil In Shirur Loksabha

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..