esakal | पवारसाहेब मोदीबागेत राहतात हे मला माहितीही नाही : जयकुमार गोरे
sakal

बोलून बातमी शोधा

Jaykumar Gore

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जयकुमार गोरे यांनी भाजपाच्या गोटात प्रवेश करत आमदारकीची माळ पुन्हा गळ्यात घातली. मात्र त्याचदरम्यान झालेले आरोप-प्रत्यारोपाची चर्चा अजूनही संपलेली नाही. त्यातच ही भेट झाल्याच्या चर्चेने अनेकांच्या भुवया उंचावल्या. या भेटीची चर्चा राजकीय वर्तुळात क्षणातच पसरली तरीही अनेक जण यावर विश्वास ठेवायला तयार नव्हते आणि झालेही तसेच.

पवारसाहेब मोदीबागेत राहतात हे मला माहितीही नाही : जयकुमार गोरे

sakal_logo
By
अमोल कविटकर

पुणे : भाजपचे २० ते २५ आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एकीकडे मुंबईत केला आणि दुसरीकडे लागलीच भाजपचे माणचे आमदार जयकुमार गोरे हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे पुण्यातील निवासस्थान असलेल्या मोदीबागेत पोहोचले. गोरे हे पवार यांच्याच भेटीला आल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि एकच खळबळ उडाली. मात्र काहीच वेळात गोरे हे खासगी कामानिमित्त मोदीबागेत आल्याचे पुढे आले आणि पवार-गोरे भेटीच्या चर्चेचा धुराळा खाली बसला.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जयकुमार गोरे यांनी भाजपाच्या गोटात प्रवेश करत आमदारकीची माळ पुन्हा गळ्यात घातली. मात्र त्याचदरम्यान झालेले आरोप-प्रत्यारोपाची चर्चा अजूनही संपलेली नाही. त्यातच ही भेट झाल्याच्या चर्चेने अनेकांच्या भुवया उंचावल्या. या भेटीची चर्चा राजकीय वर्तुळात क्षणातच पसरली तरीही अनेक जण यावर विश्वास ठेवायला तयार नव्हते आणि झालेही तसेच.

युती केली चूक झाली : रावसाहेब दानवे

या कथित चर्चेनंतर पवार खासगीकामानिमित्त बाहेर पडत असतानाच माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना गाठले. जयकुमार कुमार गोरे तुमच्याकडेच आले होते का? असा प्रश्न विचारताच पवारही आश्चर्यकारक चेहऱ्याने पवार म्हणाले, 'माझ्याकडे? तुम्हाला (पत्रकारांना उद्देशून) झालंय तरी काय? या भेटीचे पवार यांनी खंडन केल्यावर जयकुमार गोरे यांच्याशी संपर्क केला, त्यावर ते म्हणाले, 'पवार साहेब मोदीबागेत राहतात हे मला माहितीही नाही. मी त्यांची भेट घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आणि तेही मला भेट देतील असे वाटत नाही. मी माझ्या कुटूंबियांसमवेत खासगी कामानिमित्त मोदीबागेत गेलो होतो. माझा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास आहे. कोण कोणाच्या संपर्कात आहे. हे समजायला जास्त काळ राहिलेला नाही.'

बाळासाहेबांना अभिवादन करताना फडणवीस म्हणतात, स्वाभिमान जपा

loading image