
पुणे : आमदार योगेश टिळेकर यांचे मामा आणि हॉटेल व्यावसायिक सतीश सातबा वाघ (वय ५५) यांचे अपहरण करून खून केल्याची धक्कादायक घटना सोमवारी घडली. वाघ याचा यवत पोलिस ठाण्याच्या हद्दीत मृतदेह आढळून आला आहे. ते आज ‘मॉर्निंग वॉक’साठी गेल्यानंतर मांजरी-फुरसुंगी रस्त्यावर ही घटना घडली.