esakal | शिवसेनेबरोबर आमचे भांडण नाही, आम्ही एका मनाचे : गिरीश बापट

बोलून बातमी शोधा

Girish Bapat

महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला कौल दिला होता. त्यामुळे युतीचाच मुख्यमंत्री व्हायला पाहिजे होता. परंतु तसे झाले नाही. त्यामुळे जनता शिवसेनेवर नाराज आहे. कुणीच सरकार स्थापन करू न शकल्याने पेच निर्माण झाल्याने राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे.

शिवसेनेबरोबर आमचे भांडण नाही, आम्ही एका मनाचे : गिरीश बापट
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : शिवसेनेबरोबर आमचे काही भांडण नाही. आम्ही एका मनाचे, एका दिलाचे आहोत. राष्ट्रवादी आणि काँग्रेसने त्यांना दिलेल्या अनुभवानंतर त्यांच्यात जर काही मत परिवर्तन झाले असेल, भाजप त्याचे स्वागत करील, अशी प्रतिक्रिया खासदार गिरीश बापट यांनी दिली.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू; महाराष्ट्रात तिसऱ्यांदा राष्ट्रपती राजवट

त्रिपुरी पौर्णिमेनिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी आले असताना, ते सकाळशी बोलत होते.
बापट म्हणाले, "महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला कौल दिला होता. त्यामुळे युतीचाच मुख्यमंत्री व्हायला पाहिजे होता. परंतु तसे झाले नाही. त्यामुळे जनता शिवसेनेवर नाराज आहे. कुणीच सरकार स्थापन करू न शकल्याने पेच निर्माण झाल्याने राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. हीच स्थिती कायम राहील असे नाही. विरोधक एकत्र आले, तर ते सरकार बनवू शकतील."

कोण आहेत राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी? जाणून घ्या