esakal | संजय काकडे घालणार 'घड्याळ'?; पवारांकडून निमंत्रण असल्याची माहिती
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay Kakade

संजय काकडे हे नेहमीच पवार कुटुंबीयांच्या संपर्कात असतात. अजित पवारांनी बंड केल्यानंतर ते शरद पवारांना भेटण्यासाठी गेले होते. आता पुन्हा एकदा राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने ते चर्चेत आले आहेत.

संजय काकडे घालणार 'घड्याळ'?; पवारांकडून निमंत्रण असल्याची माहिती

sakal_logo
By
सागर आव्हाड

पुणे : राज्यसभेतील भाजप पुरस्कृत खासदार संजय काकडे यांनी पुढील महिन्यात होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचे संकेत दिले आहे. जळगावमध्ये होणाऱ्या मेळाव्यात ते राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यसभेसाठी भाजपकडून दोन ते तीन दिवसांत उमेदवारी जाहीर झाली नाही तर ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. त्यांच्यासोबत अन्य काही कार्यकर्ते राष्ट्रवादीत जाण्याची शक्यता आहे. जळगावमध्ये हा मेळावा होणार असून, पुढील महिन्यात हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात अन्य पक्षातील काही नेतेही राष्ट्रवादी समावेश करण्याची शक्यता आहे.

संजय काकडे हे नेहमीच पवार कुटुंबीयांच्या संपर्कात असतात. अजित पवारांनी बंड केल्यानंतर ते शरद पवारांना भेटण्यासाठी गेले होते. आता पुन्हा एकदा राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने ते चर्चेत आले आहेत. त्यांचा राज्यसभापदाचा कार्यकाळ संपत असून, पुढील महिन्यात महाराष्ट्रातील 7 जागांसह 55 जागांची निवडणूक होणार आहे. भाजपकडून दोन खासदार निवडून जाण्याची शक्यता आहे. पण, या यादीतून काकडे यांचे नाव वगळण्याची शक्यता असल्याने त्यांनी राष्ट्रवादीची वाट पकडल्याचे बोलले जात आहे. पुणे महापालिकेत सत्ता, आमदारांची संख्या वाढविण्यात त्यांचा मोठा वाटा असतानाही त्यांना भाजपकडून डावलण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.