
‘आम्ही काय येथे येडे म्हणून बसलो नाही. आम्हाला विचारात न घेता परस्पर काम केले जात आहे. हे चालणार नाही,’ अशा शब्दांत सत्ताधारी भाजपने बुधवारी महापालिका प्रशासनाला खडसावले. सत्ताधारी पक्ष भर बैठकीत अशा प्रकारे अपमान करीत असल्याने प्रशासनाचा संयम सुटल्याने त्यांनीदेखील याच भाषेच उत्तर दिले. त्यामुळे बैठकीत तणाव निर्माण झाल्याचे पाहून एका अधिकाऱ्यांनी मध्यस्ती केल्यानंतर हा वाद मिटला.
पुणे - ‘आम्ही काय येथे येडे म्हणून बसलो नाही. आम्हाला विचारात न घेता परस्पर काम केले जात आहे. हे चालणार नाही,’ अशा शब्दांत सत्ताधारी भाजपने बुधवारी महापालिका प्रशासनाला खडसावले. सत्ताधारी पक्ष भर बैठकीत अशा प्रकारे अपमान करीत असल्याने प्रशासनाचा संयम सुटल्याने त्यांनीदेखील याच भाषेच उत्तर दिले. त्यामुळे बैठकीत तणाव निर्माण झाल्याचे पाहून एका अधिकाऱ्यांनी मध्यस्ती केल्यानंतर हा वाद मिटला.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
शहरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेचा आढावा घेण्यासाठी सत्ताधारी पक्षाने महापालिका प्रशासनाबरोबर बैठक आयोजित केली होती. या बैठकीत नियोजित अटलबिहारी वाजपेयी रुग्णालयाच्या कामकाजाचा आढावा घेण्यावरून हा वाद सुरू झाला. रूग्णालयाच्या कामास विलंब होत असल्याचे कारण काढून सत्ताधारी पक्षातील एका नेत्याने थेट प्रशासनावर कडक भाषेत जाब विचारण्यास सुरुवात केली. त्या नेत्याची भाषा बघून काही वेळाने महापालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांचा तोल गेला. त्यांनीही त्याच भाषेत त्या नेत्याला उत्तर देण्यास सुरूवात केली. त्यावर हा वाद विकोपाला गेला.
कोरोनाचा ससंर्ग वाढतोय; बारामतीत प्रशासनाने दिले खबरदारीचे आदेश
अखेर एका अधिकाऱ्याने मध्यस्ती करीत हा वाद थांबविला. त्यानंतर तो नेता आणि तो अधिकारी बैठकीच्या ठिकाणी बाजूला जाऊन एकत्र बसले आणि दोघांनी चर्चा करून ‘बट्टी’ घेतली. त्यानंतर वाद मिटल्याचे जाहीर करून बैठक पुन्हा सुरू झाली. त्यामुळे आज दिवसभर महापालिका वर्तुळात हा चर्चेचा विषय झाला होता.
पुणेकरांनो कोरोनाला इथेच रोखा; वाचा जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
...म्हणून घडले रामायण
मिळालेल्या माहितीनुसार या प्रकल्पासाठी नेमण्यात आलेल्या सल्लागारावरून हा वाद असल्याचे समजते. सल्लागार तोच असावा अशी आग्रही भूमिका सत्ताधारी पक्षातील नेत्यांची आहे. तो सल्लागार काम करीत नसल्यामुळे कामास विलंब होत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यामुळे तो बदलण्यात यावा, अशी प्रशासनाची भूमिका आहे. त्यावरून हे रामायण घडले असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे रुग्णालयात उभारण्यापेक्षा हित पाहण्याकडे जादा लक्ष दिले जात असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात सुरू होती.
Edited By - Prashant Patil