बारामतीत पडळकरांच्या प्रतिमेस दुधाचा अभिषेक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जून 2020

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेस आज भाजपच्या कार्यकर्त्यांनी दुधाचा अभिषेक घालत त्यांना समर्थन दिले.

बारामती : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेस आज भाजपच्या कार्यकर्त्यांनी दुधाचा अभिषेक घालत त्यांना समर्थन दिले. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह शब्दांचा वापर केल्यानंतर राज्यभरातून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून गोपीचंद पडळकर यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या पार्श्वभूमीवर बारामतीत भाजप कार्यकर्त्यांनी बारामती शहरात त्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली होती. आज तालुकाध्यक्ष पांडुरंग कचरे, शहराध्यक्ष सतीश फाळके, जिल्हा सरचिटणीस अविनाश मोटे यांच्यासह गोविंद देवकाते, ऍड. ज्ञानेश्वर माने, जयराज बागल, विशाल कोकरे, प्रकाश मोरे, प्रमोद खराडे, भाऊसाहेब मोरे व इतर कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राज्यभरातून पडळकर यांच्याविरोधात राष्ट्रवादीने रान उठवले. राष्ट्रवादीसह भाजपच्याही बड्या नेत्यांनी या प्रकरणी आपापल्या प्रतिक्रिया दिल्या. बारामतीत भाजपच्या तालुकाध्यक्ष व शहराध्यक्षांनी यात पडळकर यांची पाठराखण करत त्यांना आजही समर्थन दिले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

उंडवडी येथे आज भाजपच्या कार्यकर्त्यांनी गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेस दुधाचा अभिषेक घालत त्यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. 'एकच छंद गोपीचंद...आय सपोर्ट गोपीचंद पडळकर' अशा घोषणा मोजक्या कार्यकर्त्यांनी देत समर्थन व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. या  प्रकारानंतर सहा प्रमुख कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांना तालुका पोलिस ठाण्यात नेले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP Party Workers of Baramati Support to Gopichand Padalkar