पंकजा मुंडेंच्या सभेत गोंधळ घालणारे कार्यकर्ते भाजपचेच

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 ऑक्टोबर 2019

पिंपरी चिंचवडमधील कैलास मंगल कार्यालयात भाजपच्या उमेदवार लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारार्थ पंकजा मुंडे यांची सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र, या सभेत मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली. घोषणाबाजी करणारे घर बचाव कृती समितीचे सदस्य असल्याची माहिती समोर आली.

पिंपरी : पंकजा मुंडे यांच्या चिंचवडमधील सभेतील गोंधळाचे आता भाजप कनेक्शन समोर आले आहे. भाजपचे स्वीकृत सदस्य संदीप गाडे यांची बहीण सुनीता फुले घोषणाबाजी करत होत्या. यामुळे शहरात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 

वाकड पोलिसांनी 3 महिला आणि 3 पुरुष अशा सहा जणांना ताब्यात घेतल्यानंतर ही माहिती समोर आली. भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिलाय. गाडे हे प्रभाग कार्यालयात स्वीकृत सदस्य आहेत. त्यांनीच आज पंकजा मुंडे यांची सभा सुरु असताना गोंधळ घातला.

पिंपरी चिंचवडमधील कैलास मंगल कार्यालयात भाजपच्या उमेदवार लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारार्थ पंकजा मुंडे यांची सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र, या सभेत मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली. घोषणाबाजी करणारे घर बचाव कृती समितीचे सदस्य असल्याची माहिती समोर आली. पिंपरी चिंचवड शहरात प्रस्तावित रिंग रोड मार्गात अनेकांची बेकायदा घरे आहेत. त्यावर पिंपरी चिंचवड नवनगर प्राधिकरण त्यावर हातोडा चालवणार आहेत. ती घरे नियमित करावीत अशी बाधितांची भाजपकडे मागणी आहे. घर बचाव कृती समिती संघटना यासाठी वेगवेगळे आंदोलन करते. त्याच आंदोलनानंतर भाजपने योग्य तो तोडगा काढू असे आश्वासन दिले होते. ते अद्याप पूर्ण न झाल्याने कृती समितीच्या सदस्यांनी आज पंकजा मुंडेंच्या सभेत गोंधळ घातला. हे सरकार फसवे आहे, आमची घरं नियमित केली नाहीत. अशा आशयाच्या त्यांनी घोषणा दिल्याची माहिती स्थानिक भाजप नेत्यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP party workers obfuscation in pankaja mundes rally at chinchwad