bjp leaders
sakal
पुणे - आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली आहे. पुणे महापालिका, पिंपरी चिंचवड महापालिका आणि पुणे ग्रामीण दक्षिण (बारामती), पुणे ग्रामीण उत्तर (मावळ) या भागांसाठी निवडणूक प्रभारी म्हणून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे जबाबदारी दिली आहे. तर निवडणूक प्रमुख म्हणून माजी सभागृह नेते गणेश बिडकर, आमदार महेश लांडगे, राहुल कुल आणि शंकर जगताप यांची नियुक्ती केली आहे.