
BJP Protest
Sakal
पुणे : बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करून मोदींच्या आईचा व्हिडिओ तयार केल्याच्या विरोधात भाजप आक्रमक झाला आहे. मोदी आणि त्यांच्या आईचा अवमान केल्याच्या विरोधात शनिवारी (ता. १३) टिळक चौकात भाजपच्या महिला आघाडीतर्फे आंदोलन करून काँग्रेसचा निषेध करण्यात आला.