

PMC Election BJP
esakal
पुणे महापालिका निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवार यादीला विलंब का झाला, याची आतल्या गोटातील माहिती समोर येत आहे. मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीत उमेदवारांच्या नावांवरून पक्षनेत्यांमध्ये एकमत होऊ शकले नाही. त्यामुळे शुक्रवारी (ता. २६ डिसेंबर) जाहीर होणारी पहिली यादी तहकूब झाली.