

भाजप पदाधिकारी बैठक लोगो करणे
PNE26W47764
अहिल्यानगर ः भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे उद्घाटन करताना विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे. समवेत शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, उत्तर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, जिल्हा प्रभारी राम सातपुते, शहर प्रभारी भैरवी वाघ, उपमहापौर धनंजय जाधव आदी.
मोदी, फडणविसांमुळे भाजपला चांगले दिवस
प्रा. राम शिंदे ः ‘पार्टी विथ डिफरन्स’ विचारावर पक्षाचे काम
अहिल्यानगर, ता. ६ ः भाजप ही संघटनात्मक ढाच्यावर भक्कमपणे उभी आहे. ‘पार्टी विथ डिफरन्स’ या विचारावर काम होत असल्याने भाजप हा मोठाच पक्ष आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या योग्य कामामुळे भाजपला हे चांगले दिवस आले आहे, असे प्रतिपादन विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी केले. आगामी सर्व निवडणुकांचे नियोजन आत्तापासूनच करणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.
भाजपच्या शहर, दक्षिण व उत्तर जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन आज नगर शहरात झाले. यावेळी शिंदे यांनी मार्गदर्शन केले. आमदार विक्रमसिंह पाचपुते, आमदार अक्षय कर्डिले, उपमहापौर धनंजय जाधव, शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, उत्तर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, जिल्हा प्रभारी राम सातपुते, शहराच्या प्रभारी भैरवी वाघ आदी उपस्थित होते.
सध्याच्या आधुनिक काळात समाज माध्यमांना महत्त्व आले आहे. त्यामुळे भाजपचा प्रत्येक पदाधिकारी, कार्यकर्ता प्रशिक्षित व सक्षम असावा यासाठी पक्षाचे सर्वत्र प्रशिक्षण वर्गाचे आयोजन होत आहे. विरोधकांच्या खोट्या नॅरेटीव्हला योग्यप्रकारे उत्तर देणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
पाचपुते म्हणाले,‘‘ २०४७ सालच्या विकसित भारताची सर्वात मोठी शक्ती युवक आहे. आज भारतात सर्वात जास्त युवक आहेत. म्हणून त्यांचे योगदान खूप महत्त्वाचे आहे. तरुण पिढीला योग्य दिशा देणे आवश्यक आहे.’’ जिल्हा सरचिटणीस अशोक गायकवाड यांनी आभार मानले.
----
झेडपीच्या साठ जागा जिंकू
बैठकीच्या दुसऱ्या सत्रात भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.सुजय विखे पाटील यांनी भाजपच्या कार्यपद्धतीचा मूलमंत्र ‘राष्ट्र प्रथम, पक्ष नंतर आणि मी शेवटी’ हा आहे. मात्र व्यक्तिगत स्वार्थाला पक्षापेक्षा प्राधान्य देण्याची प्रवृत्ती वाढणे योग्य नाही. नेत्यांप्रति वैयक्तिक निष्ठा असली तरी सर्वप्रथम निष्ठा पक्षाशी असली पाहिजे, असे सांगितले.अहिल्यानगर महापालिकेत भाजपचे २५ नगरसेवक निवडून आले आहेत. पक्षाची संघटनात्मक ताकद वाढत आहे. याच ताकदीने आपण लढत राहिलो, तर जिल्हा परिषदेच्या ७५ पैकी ६० जागा भाजपच्या येतील. जिल्हा परिषद अध्यक्षपदही भाजपकडे येईल असा विश्र्वासही त्यांनी व्यक्त केला.
इन्फो
सातपुतेंनी टोचले नगरसेवकांचे कान
भाजपचे जिल्हा प्रभारी आमदार राम सातपुते यांनी शहरात आयोजित या बैठकीला नगरसेवक अनुपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे कान टोचले. पक्षाच्या चिन्हामुळे आपण नगरसेवक झालो आहोत, हा विचार ठेवावा. सभापती राम शिंदे हे विधान परिषदेच्या मोठ्या पदावर आहेत, मात्र तरीही ते बैठकीला अर्धा तास आधी आणि पूर्णवेळ उपस्थित राहिले. विधानसभेला पराभूत होऊनही त्यांना पक्षाने एवढे मोठे पद दिले. कारण त्यांच्यातील कार्यकर्त्याची जाणीव पक्षाला आहे. जिल्हाध्यक्ष, पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना कार्यकर्तेपणाचा संस्कार द्यावा. आपण जर चुकत राहिलो तर आपली आम आदमी पार्टी व्हायला वेळ लागणार नाही, असेही ते म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.