Pune BJP: भाजपच्या बालेकिल्ल्यांतच मोठी गळती; खडकवासला कोथरूडमध्ये ४६ टक्क्यांहून अधिक मतदार वगळले

BJP Strongholds See Major Voter Drop In Pune SIR Draft: पुण्यात भाजपच्या बूथ यंत्रणेवर प्रश्नचिन्ह; बालेकिल्ल्यांमध्ये ४६ टक्क्यांहून अधिक मतदार यादीबाहेर
BJP Faces Major Challenge In Pune As SIR Draft Excludes Over 46 Percent Voters From Kothrud And Khadakwasla Constituencies

BJP Faces Major Challenge In Pune As SIR Draft Excludes Over 46 Percent Voters From Kothrud And Khadakwasla Constituencies

sakal

Updated on

-ब्रिजमोहन पाटील

पुणे : भाजपची बूथ यंत्रणा खूप मजबूत असल्याचा दावा पक्षाकडून केला जातो. पण विशेष सखोल पुनरीक्षणाची (एसआयआर) प्रारूप मतदारयादी जाहीर झाल्यानंतर हा दावा फोल ठरला असल्याचे समोर आले आहे. भाजपचे बालेकिल्ले असलेल्या खडकवासला, कोथरूड आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेल्या हडपसर विधानसभा मतदारसंघातील ४५ टक्क्यांहून अधिक मतदारांची नावे यादीतून वगळली गेली आहेत. शिवाजीनगरमध्ये ४४.४७ टक्के मतदार प्रारूप यादीत नाहीत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com