‘एसआयआर’च्या दुसऱ्या टप्प्यासाठी सज्ज व्हा

‘एसआयआर’च्या दुसऱ्या टप्प्यासाठी सज्ज व्हा
Published on

सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता.१९ : विशेष मतदारयादी पुनरीक्षण मोहिमेच्या (एसआयआर) पहिल्या टप्प्यात भाजप कमी पडला असून, त्यानिमित्ताने मतदारांपर्यंत पोहोचण्याची संधी पक्षाने गमावली, अशी खंत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केली. हे अपयश झटकून ‘एसआयआर’च्या दुसऱ्या टप्प्यासाठी सज्ज व्हा. विरोधकांचे प्राबल्य असलेल्या बूथवर तातडीने बीएलए नियुक्त करून मतदारांशी संपर्क वाढवा, असे निर्देश त्यांनी पक्षाचे आजी-माजी लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांना दिले.
भाजपच्या उत्तर महाराष्ट्र व मराठवाडा कार्यकारिणीच्या बैठकीत ते बोलत होते. या वेळी चव्हाण बोलत होते. पालकमंत्री गिरीश महाजन, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, दुग्धविकासमंत्री अतुल सावे, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर आदी उपस्थित होते.
एसआयआरच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील एक लाख ३६ हजार मतदान केंद्रांपैकी ९३ हजार केंद्रांवर बीएलए नियुक्त करण्यात भाजपला यश आले. मात्र, उर्वरित केंद्रांवर विरोधकांचे प्राबल्य असल्याने दुसऱ्या टप्प्यात या केंद्रांवर विशेष लक्ष केंद्रित करून तातडीने बीएलए नेमावेत, अशी सूचना चव्हाण यांनी केली. पक्षात केवळ मंत्री आणि नेत्यांच्या मागे-पुढे करण्यासाठी जबाबदारी दिली जात नाही. त्यामुळे पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष मैदानात उतरून काम करावे, अशा शब्दांत त्यांनी कानपिचक्या दिल्या.

बूथ सक्षम करण्यावर भर
वर्षअखेरीस जिल्हा परिषद, पंचायत समित्या तसेच नगरपंचायतींच्या निवडणुकांचे बिगुल वाजण्याची शक्यता आहे. त्यामुळे पदाधिकाऱ्यांनी आतापासूनच तयारीला लागावे. स्थानिक पातळीवर संघटन मजबूत करताना मतदारांशी सातत्याने संपर्क ठेवावा आणि प्रत्येक बूथ सक्षम करण्यावर भर द्यावा, असे चव्हाण यांनी सांगितले.

विरोधकांच्या बालेकिल्ल्यात संपर्क वाढवा
एसआयआरचा दुसरा टप्पा महत्त्वाचा असून, प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्याने त्यात सक्रिय सहभाग नोंदवावा. केवळ भाजपचे प्राबल्य असलेल्या भागांपुरते काम मर्यादित न ठेवता विरोधकांचे प्राबल्य असलेल्या परिसरातील मतदारांशी संपर्क वाढवावा, असा कानमंत्र चव्हाण यांनी दिला.


फोटो क्रमांक : एच-२७३१२, १३, १४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

BJP Faces Major Challenge In Pune As SIR Draft Excludes Over 46 Percent Voters From Kothrud And Khadakwasla Constituencies
Ravindra Chavan
खारघरमध्ये मतदारांच्या डेटा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; राजकीय वर्तुळात मोठी खळबळ! ३,४०४ भरलेले अधिकृत एसआयआर फॉर्म झेरॉक्स करताना भाजप पदाधिकाऱ्याला रंगेहाथ पकडले;  भाजप पदाधिकाऱ्यांवर खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Ravindra Chavan
Marathi News Esakal
www.esakal.com