....त्यासाठी भाजपला राज्यातून हद्दपार करावं लागेल - पृथ्वीराज चव्हाण

कोरोनामुळे लाखो लोकांचे संसार उद्धवस्त झाले असून, २३ कोटी नागरिक दारिद्रय रेषेखाली ढकलले गेले.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणsakal

शिवाजीनगर : "पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसचे दर गगनाला भिडल्याने सामान्य नागरिकांचे जगणं मुश्किल होऊन बसले आहे. कोरोनामुळे लाखो लोकांचे संसार उद्धवस्त झाले असून, २३ कोटी नागरिक दारिद्रय रेषेखाली ढकलले गेले. लसीकरणातही मोदी सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. येणाऱ्या निवडणुकीत भाजपला महाराष्ट्रातून हद्दपार करावं लागेल," असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan)यांनी व्यक्त केले. (BJP expelled Maharashtra say Former Chief Minister Prithviraj Chavan)

प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने ७ जुलै पासून दरवाढ, महागाई विरोधात राज्यात विविध ठिकाणी पेट्रोल पंपावर दरवाढी विरोधात स्वाक्षरी मोहिम, आंदोलन करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर चव्हाण यांनी रविवार (ता.१८) जुलै रोजी शिवाजीनगर येथील कॉंग्रेस भवन येथे पत्रकार परिषदेत घेतली होती. त्यावेळी ते बोलत होते.

काँग्रेसने कमावले मोदींनी विक्रीस काढले

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, इंधन दरवाढीविरुद्ध राज्यात एक कोटी सह्यांची मोहीम राबवण्यात येणार आहे. काँग्रेसने आपल्या कार्यकाळात कमावले मात्र मोदींनी ते विक्रीस काढले. LIC सारख्या अनेक शासकीय संस्था खाजगीकरुन विक्रीस काढल्या. स्वतंत्र्य भारताच्या इतिहासात इतका खाली विकास दर कधी गेला नव्हता. देश चालवण्यासाठी मोदी सरकारने ३२ लाख कोटी रुपयांचे कर्ज काढले आहे. अर्थव्यस्थेचे वाटोळे झाले असून, ती रुळावर आणण्यासाठी लसीकरण करणे हाच रामबाण उपाय आहे.

चौकशी समितीचा ब्लॅकमेल करण्यासाठी वापर

केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर कुत्री अंगावर सोडल्यासारखे केला जातोय. धाडी टाकणे, पेपरमध्ये आकडे दाखवले जातात मात्र शेवटी हाती काहीच लागत नाही. एकनाथ खडसे यांनी भाजप सोडले की त्यांच्या जावयावरती ईडी सोडली. चौकशी समितीचा ब्लँकमेल करण्यासाठी वापर केला जात आहे. तसेच, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री लोकप्रिय आहेत त्यांना पंतप्रधान केलं पाहिजे असे सांगून विधानसभेचे अध्यक्षपद काँग्रेसकडे राहणार आहे हे सांगायला शेवटी पृथ्वीराज चव्हाण विसरले नाही.

मागील वर्षभरात झालेली भाववाढ

  • पेट्रोल २३%

  • डिझेल २८%

  • स्वयंपाक गॅस ४१%

इंधन कंपन्यांना झालेला फायदा (नफा)

इंडियन ऑइल

  • २०१९-२०=३१३ कोटी

  • २०२०-२१=२१८३६ कोटी (१७ पट वाढ)

भारत पेट्रोलियम

  • २०१९-२०=२६८३ कोटी

  • २०२०-२१=१९०४१ कोटी

हिंदूस्थान पेट्रोलियम

  • २०१९-२०=२६३७ कोटी

  • २०२०-२१=१०६६४ कोटी (३ पट वाढ)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com