BJP
पुणे - पुणे महापालिकेसाठी भाजपच्या आमदार, खासदारांच्या मुलांना, जवळच्या नातेवाइकांना उमेदवारी न देण्याचा निर्णय भाजपच्या नेतृत्वाने घेतला आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींना जोरदार झटका बसला आहे, तर कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. गुजरात, दिल्ली पॅटर्नप्रमाणे पुण्यासह महाराष्ट्रात हा निर्णय लागू केला आहे.