...आणि घारीला मिळाले जीवनदान

जखमी अवस्थेत लटकलेल्या घारीला पक्षी मित्र बाळासाहेब बबनराव ढमाले यांच्या मुळे जीवनदान मिळाले
Black kite injured on tree for last three days Balasaheb Dhamale gave it life bird protection
Black kite injured on tree for last three days Balasaheb Dhamale gave it life bird protectionsakal
Updated on

Pune News : गेल्या तीन दिवसांपासून झाडावर जखमी अवस्थेत लटकलेल्या घारीला पक्षी मित्र बाळासाहेब बबनराव ढमाले यांच्या मुळे जीवनदान मिळाले आहे.

ढमाले हे इलेक्ट्रिक ची कामे करतात. मात्र कामातून पक्ष्यांच्या बाचावकरिता फोन आला की, सगळी कामे सोडून ते लगबगीने या मुक्या पक्षांचा जीव वाचविण्याकरिता तत्पर असतात.

गेल्या १५ वर्षापासून हे पक्षी मित्र आहेत. त्यांनी आजपर्यंत अनगिणत पक्षी वाचविले आहेत. अलीकडे मकर संक्रांतीला पतंग उडविण्याचे प्रमाण हे वाढत चाललेले आहे. अशा लोकांची हौस होते त्यात या पक्षांना मात्र आपला प्राण मुकावा लागतो.

संक्रांती पासून ते आता पर्यंत त्यांनी ४० पेक्षा ही अधिक कावळा, घुबड, कबूतर, पारवे, घार अशा अनेक पक्ष्यांची सुटका केली आहे.

मांज्या मध्ये अडकलेल्या जखमी पक्ष्यांना जीवनदान दिले आहे. असाच प्रसंग रास्ता पेठेतील अपोलो टाँकिज येथील इंद्दप्रस्थ कॉम्प्लेक्स परिसरात झाडावर पतंगाच्या मांजाला अडकलेली घार तीन दिवसांपासून सुटका करण्याचा प्रयत्न करीत होती.

मात्र, मांजामध्ये पंख अडकल्याने घार निपचित पडली होती. रास्ता पेठेतील कपड्याचे व्यापारी विनय जैन यांनी अडकलेली घार पाहिली आणि पक्ष्यी मित्र बाळासाहेब ढमाले यांना ही माहिती दिली. ढमाले यांनी तातडीने अग्निशमन दलाचे प्रभारी कमलेश रघुनाथ चौधरी यांना फोन केला.

यावेळी तांडेल संजय बाबुराव गायकवाड, फायरमन एकनाथ ज्ञानेश्वर कुंभार, संतोष रामभाऊ अरगडे , सुरेश लिंबराज पवार , हरीश राधेश्याम बुंदेले , निलेश विठ्ठल कर्णे, मदतनीस महेश गरड, नाईकनवरे आतिश ,मयूर सुक्रे आदी जवानांनी तातडीने झाडावर चढून जखमी घारीची सुटका केली.

मांज्यामुळे पंख कापले गेले होते, त्यावर हळद लावून कात्रजमधील प्राणीसंग्रहालयात नेऊन दिले, असे ढमाले यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.