Pune Airport : सुरक्षित उड्डाणांसाठी ‘घार’ ठरतेय सर्वात मोठा अडथळा; हवाई दलाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजनांना वेग

पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि लोहगाव हवाईतळावरून होणाऱ्या नागरी व लष्करी विमानांच्या सुरक्षित उड्डाणांना ‘घार’ (ब्लॅक काइट) या पक्ष्यापासून सर्वाधिक धोका.
Black kite

Black kite

sakal

Updated on

- प्रज्वल रामटेके

पुणे - पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि लोहगाव हवाईतळावरून होणाऱ्या नागरी व लष्करी विमानांच्या सुरक्षित उड्डाणांना ‘घार’ (ब्लॅक काइट) या पक्ष्यापासून सर्वाधिक धोका असल्याचे भारतीय हवाई दलाच्या निरीक्षणातून स्पष्ट झाले आहे. विमानतळाच्या आजूबाजूला उघड्यावर टाकण्यात येणारा कचरा आणि अयोग्य व्यवस्थापनामुळे हे पक्षी मोठ्या संख्येने आकर्षित होत असून, उड्डाणाच्या आणि लँडिंगच्या अत्यंत संवेदनशील वेळी ते विमानांच्या मार्गात मोठा अडथळा ठरत आहेत. या पार्श्वभूमीवर हवाई दलाने आता धावपट्टी परिसरात आठ ‘बर्ड डिस्ट्रॅक्शन मॉड्यूल’, १६ ठिकाणी नियमित मानवी गस्त आणि इतर प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com