खडकवासला : गे डेटिंगसाठी अॅपवरून ओळख झाल्यानंतर एका तरुणाशी जबरदस्ती करत त्याच्याकडून आठ हजार रुपये उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी नांदेड सिटी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे..फिर्यादीच्या तक्रारीवरून नांदेड सिटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. रॉबिन ऊर्फ शुभम उपेंद्र कांबळे (वय २७, रा. नांदेड फाटा, सिंहगड रस्ता) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याचा साथीदार ओंकार मंडलिक (रा. वडगाव खुर्द) सध्या फरार असून त्याचा शोध घेण्यात येत आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक अतुल भोस यांनी दिली..अॅपवरून ओळख झाल्यानंतर आरोपीने फिर्यादी तरुणाला नांदेड सिटीच्या प्रवेशद्वाराजवळ एका हॉटेलमध्ये बोलावून घेतले. तेथून आरोपी आणि त्याच्या मित्राने फिर्यादीला कारमधून मोकळ्या जागी नेले. तेथे आरोपीने फिर्यादीशी लगट करण्याचा प्रयत्न केला. त्यास विरोध केल्यावर त्याचा व्हिडिओ तयार करून कुटुंबीयांना पाठवण्याची धमकी दिली. .त्यानंतर फिर्यादीचा मोबाईल हिसकावून त्यातून ॲपद्वारे आठ हजार रुपये आरोपीच्या मित्राच्या खात्यावर पाठवले. तसेच, कोणाला सांगितल्यास जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देण्यात आली. तपासादरम्यान, पोलिस अंमलदार प्रतीक मोरे आणि स्वप्नील मगर यांना मिळालेल्या माहितीनुसार आरोपी रॉबिन ऊर्फ शुभम कांबळे याला अटक करण्यात आली..Chess Tournament : प्रज्ञानंद कार्लसन आमनेसामने; लास वेगासमध्ये बुद्धिबळाची रणधुमाळी.न्यायालयाने आरोपीला १७ जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. पोलिस उपायुक्त संभाजी कदम, सहाय्यक आयुक्त अजय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड सिटीचे वरिष्ठ निरीक्षक अतुल भोस, पोलिस निरीक्षक (गुन्हे) गुरुदत्त मोरे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. तपास पथकात सहाय्यक निरीक्षक राहुल यादव, पोलिस अंमलदार संग्राम शिनगारे, राजू वेगरे, शिवाजी क्षीरसागर, मोहन मिसाळ, अक्षय जाधव, नीलेश कुलथे, उत्तम शिंदे, नीलेश खांबे, गांगुर्डे, सतीश खोत, विशाल तांबे यांचा समावेश होता..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.