वाघोली - वाघोलीत बांधकाम साईटवर ब्लास्ट घडवून आणून नागरिकांना व सार्वजनिक मालमत्तेस धोका निर्माण करणाऱ्या दोघांवर वाघोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्याकडील सुमारे सव्वा चार लाख रुपये किमतीच्या वस्तू जप्त करण्यात आल्या..अर्जुन तात्याबा कंद (वय-३५ वर्षे, रा. लोणीकंद, ता. हवेली) व प्रमोद संभाजी भाडळे (वय-३२ वर्षे, प्रियंका सोसायटी, वाघोली ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी पोलीस शिपाई भागवत लक्ष्मण बेळगे यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाडळे यांचे गट नं. ६४७ मध्ये प्रियंका सोसायटी मध्ये बांधकाम सुरू होते. या बांधकामावर कंद यांनी ब्लास्ट घडवून आणला. या ब्लास्ट मुळे दगड उडून काही जणांचे किरकोळ नुकसान झाले. सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही..पोलिसांचा प्रतिबंध आदेश जारी असताना सुद्धा त्या आदेशचा भंग करून हा ब्लास्ट घडविण्यात आला. यामुळे पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला. या ब्लास्ट साठी लागणारे सर्व साहित्य व वाहने असा सुमारे सव्वा चार लाख रुपयांचा ऐवज जप्त केला. पुढील तपास वाघोली पोलिस करीत आहेत..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.