कौतुकास्पद : लग्नमंडपातच नवविवाहितांनी राबविले रक्तदान शिबिर

दत्ता भोंगळे
Sunday, 10 January 2021

विवाहात स्व. एकनाथकाका जगताप प्रतिष्ठानचे संतोष जगताप यांच्या संकल्पनेतून हा अनोखा रक्तदान सोहळा संपन्न झाला. यावेळी वधू-वराकडील २६ जणांनी रक्तदानाचा हक्क बजावला.

गराडे : सध्या कोरोनाच्या साथीमुळे सर्वत्र रक्ताचा तुटवडा जाणवत असून रक्तदान हि काळाची  गरज झाली आहे. या पार्श्वभूमीवर लग्नमंडपातच रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन करण्याचे काम सासवड येथील स्व. एकनाथकाका जगताप प्रतिष्ठान व त्यांच्या कुटुंबीयांनी करून समाजापुढे एक वेगळा आदर्श घालून दिला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सासवडच्या जगताप परिवारातील हनुमंत जगताप यांचे चिरंजीव अविनाश व राजापूर येथील राजेंद्र बबनराव राजेघाडगे यांची कन्या रुपाली यांचा विवाह सोहळा फलटण नजीक सुरवडी येथील रॉयल पॅलेसमध्ये नुकताच झाला. 

या विवाहात स्व. एकनाथकाका जगताप प्रतिष्ठानचे संतोष जगताप यांच्या संकल्पनेतून हा अनोखा रक्तदान सोहळा संपन्न झाला. यावेळी वधू-वराकडील २६ जणांनी रक्तदानाचा हक्क बजावला.

'क्षमता नसेल, तर ऑफलाइन परीक्षा घ्या'; अधिसभा सदस्यांनी विद्यापीठ प्रशासनाला घेतले फैलावर

माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांनी या उपक्रमाला हजेरी लावत प्रतिष्ठानचे अभिनंदन केले. जगताप परिवारातील माजी उपनगराध्यक्ष वामनराव जगताप, निरा बाजार समितीचे भानुकाका जगताप यांसह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. सर्व वऱ्हाडी मंडळींना यावेळी मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. हडपसरच्या अक्षय ब्लड बँकेने या उपक्रमाला साहाय्य केले. एका आगळ्यावेगळ्या उपक्रमाच्या या विवाहाबद्दल अनेकांनी दोन्ही परिवाराचे अभिनंदन केले.

(संपादन : सागर डी. शेलार)
 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: blood donation camp conducted by the newlyweds in the wedding tent itself