मागणीपेक्षा रक्ताचा पुरवठा कमी

Blood
Blood

पिंपरी - शहरात रक्ताच्या पिशव्यांची मागणी वाढत असताना, तुलनेने पुरवठा कमी असल्याचे चित्र आहे. मागील आर्थिक वर्षात (२०१७-१८) ४५५५ पिशव्यांचा तुटवडा जाणवला होता. यंदा मात्र पहिल्या सहामाहीतच तब्बल तीन हजार पिशव्या कमी पडल्या आहेत. रक्तदान शिबिरांना मिळणाऱ्या अल्प प्रतिसादामुळेच ही परिस्थिती निर्माण झाल्याचे निरीक्षण जाणकारांनी नोंदविले आहे. 

अनेक आजार, तसेच शस्त्रक्रियांसाठी रक्ताची गरज असते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून आवश्‍यकतेपेक्षा कमी पुरवठा होत आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांना रक्त मिळविण्यासाठी पळापळ करावी लागत आहे. डेंगीच्या रुग्णांना याचा विशेष फटका बसत असून, प्लेटलेट घटक असलेली पिशवी मिळणे दुरापास्त झाले आहे. 

रक्तदानाचे महत्त्व
वायसीएम रुग्णालयात आर्थिकदृष्ट्या मागास असलेले रुग्ण उपचार घेतात. त्यांच्याकडून रक्ताची प्रतिपिशवी साडेचारशे रुपये आकारण्यात येतात. तर, अन्य रुग्णालयामध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी हा दर ८५० रुपये आहे. खासगी रक्तपेढ्यांकडून १२०० ते १३०० रुपये शुल्क आकारण्यात येते. थॅलेसेमियाचे रुग्ण, जननी-शिशू सुरक्षा योजनेअंतर्गत उपचार घेणाऱ्यांना वायसीएम रक्तपेढीतर्फे मोफत रक्त देण्यात येते, असे माहिती रक्तसंक्रमण अधिकारी डॉ. नीता घाडगे यांनी सांगितले.  

वायसीएमकडून आवाहन
महापालिकेच्या यशवंतराव स्मृती रुग्णालयालाही रक्ताचा तुटवडा जाणवत असून, आता रुग्णालयाच्या रक्तपेढीमार्फतच रक्तदात्यांना रक्तदान करण्याचे आवाहन करत आहे. या  रक्तपेढीकडे ११ हजार रक्तदाते आहेत. 

तुटवडा का?
उन्हाळा तसेच दिवाळीच्या सुटीत अनेक नागरिक गावाला जातात. तसेच, महाविद्यालयांनाही सुटी असते. त्यामुळे रक्तदान शिबिर घेऊनही त्याला फारसा प्रतिसाद मिळत नाही. 

रोटरी क्‍लब ऑफ निगडीने नुकतेच रक्तदान शिबिर घेतले. १५० पिशव्या रक्त संकलित झाले.
- डॉ. संजय देवधर, माजी अध्यक्ष, रोटरी क्‍लब ऑफ निगडी

शहरात रक्ताची कमतरता आहे. रक्तदानाच्या शिबिरांना कमी प्रतिसाद आहे. 
- डॉ. मनोज देशमुख, वैद्यकीय अधीक्षक, वायसीएम

वायसीएम रक्तपेढीतील मागणी व पुरवठा
 १ एप्रिल ते २०१७ ते मार्च २०१८ मागणी - १२,२७८ पिशव्या, झालेला पुरवठा - ७,७२३ पिशव्या
 १ एप्रिल ते २०१८ नोव्हेंबर २०१८ मागणी - ८८०० पिशव्या, झालेला पुरवठा - ५७९३ पिशव्या 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com