esakal | पवारसाहेब अध्यक्ष असलेल्या संस्थेवर यांना मिळाली संधी 
sakal

बोलून बातमी शोधा

sharad-pawar

बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखाना संचलित शिवनगर विद्या प्रसारक मंडळाचे विश्वस्त मंडळ आज जाहिर झाले.

पवारसाहेब अध्यक्ष असलेल्या संस्थेवर यांना मिळाली संधी 

sakal_logo
By
कल्याण पाचांगणे

माळेगाव (पुणे) : बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखाना संचलित शिवनगर विद्या प्रसारक मंडळाचे विश्वस्त मंडळ आज जाहिर झाले. या संस्थेचे अध्यक्ष शरद पवार, उपाध्यक्ष बाळासाहेब तावरे, तर विश्वस्त म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदास सुप्रिया सुळे हे कार्य़रत आहेत. 

पवार कुटुंबीय या संस्थेचे तहायात विश्वस्त मंडळावर आहेत, तर साखर कारखान्याचे अध्यक्ष हे या संस्थेचे उपाध्यक्ष म्हणून कामकाज पाहत असतात. त्यामुळे विश्वस्त मंडळाच्या निवडीचे सर्वसर्वा अजित पवार यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी काॅग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी सर्वसमावेशक विश्वस्त मंडळाची नावे प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहिर केली. या प्रक्रियेत कारखाना कार्यक्षेत्रातील आठ गावातील पक्षाचे आजीृ माजी पदाधिकाऱ्यांना संधी मिळाली आहे. त्यामध्ये वसंतराव उर्फ (बाळासाहेब) बाबूराव तावरे (माळेगाव), अनिल नानासाहेब जगताप (पणदरे), महेंद्र उत्तमराव तावरे (सांगवी), रामदास तुकाराम आटोळे (खांडज), गणपत शंकराव देवकाते (नीरावागज), रवींद्र नामदेव थोरात (शारदानगर-बारामती) या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. तसेच, निमंत्रित महिला सदस्या सीमा प्रभाकर जाधव (खांडज), चैत्राली ज्ञानेश्वर गावडे (मेडद) यांना काम करण्याची संधी मिळाली आहे. विशेषतः मागिल विश्वस्त मंडळात काम केलेले अनिल जगताप यांना पुन्हा काम करण्याची संधी मिळाली आहे. महेंद्र तावरे यांनी पंचायत समिती सदस्य म्हणून काम केले आहे.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

माळेगाव कारखान्याचे उपाध्यक्ष म्हणून रामदास आटोळे यांनी काम केले आहे, तर नवनिर्वाचित विश्वस्तांनी मागिल चार महिन्यापूर्वी झालेल्या माळेगाव कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूकीत राष्ट्रवादी पक्षाचा निलकंठेश्वर पॅनेल बहुमताने येण्यासाठी महत्वपुर्ण भूमिका बजावली होती. दुसरीकडे, शिवनगर संस्था ही माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मालकीचे आहे. या संस्थेमध्ये ऊस उत्पादक सभासदांची जवळपास सात ते आठ हजार विद्यार्थी शिक्षणाचा लाभ घेत आहेत. या विद्यार्थ्यांची फी ऊस बिलातून जमा केली जाते. 
   
Edited by : Nilesh Shende