esakal | गुन्हेगाराचा ४ दिवसांपूर्वीच खून, मृतदेह शनिवारी कालव्यात सापडला.
sakal

बोलून बातमी शोधा

मृतदेह

गुन्हेगाराचा ४ दिवसांपूर्वीच खून, मृतदेह शनिवारी कालव्यात सापडला

sakal_logo
By
राजेंद्र सांडभोर

राजगुरूनगर : राजगुरूनगरचे माजी उपसरपंच सचिन उर्फ पपा भंडलकर यांच्या खुनातील एक आरोपी राहुल संभाजी मोहिते ( वय ३०, रा. चास, ता. खेड ) याचा अंदाजे चार दिवसांपूर्वी खून करून मृतदेह चासकमान धरणाच्या डाव्या कालव्यात टाकण्यात आला होता. शनिवारी तो रेटवडीजवळ आढळल्यानंतर रात्री त्याची ओळख पटली.

हेही वाचा: कात्रज परिसरात अवैध धंद्यांना पोलिसांकडून अभय

खेडचे पोलीस निरीक्षक सतीश गुरव यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी रेटवडीच्या मदारवस्ती परिसरातील चासकमान धरणाच्या कालव्यात एका तरुणाचा फुगलेला मृतदेह, एका पाईपला अडकून तरंगताना आढळला. पोलिसांनी तो मृतदेह चांडोली ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेला. त्यावेळी पंचनामा केला असता मृताचे डोक्यात, तोंडावर, हातावर, गळ्यावर व पाठीवर धारदार हत्याराने खोलवर वार झाल्याचे आढळून आले. डोक्यास गंभीर मार लागल्यामुळे तो मृत झाल्याचा अभिप्राय वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला. नातेवाईक बोलावून त्याची ओळख पटविल्यावर तो राहुल मोहिते असल्याचे स्पष्ट झाले.

हेही वाचा: अखिल भारतीय महापौर परिषदेच्या उपाध्यक्षपदी महापौर मुरलीधर मोहोळ!

मृत मोहिते याने काही दिवसांपूर्वी रोहिदास साळुंखे यांना दारू पिऊन मारहाण केलेली होती. तसेच तो त्यांना सतत त्रास देत होता, याचा त्यांचा मुलगा किरण याला राग होता. तसेच पाचसहा दिवसांपूर्वी जागेच्या वादातून, चास येथील शंकर उर्फ आबा तुकाराम मोहिते व सचिन तानाजी मोहिते ( रा. करंजविहीरे, ता. खेड ) यांची, राहुल मोहिते यांचे भांडणे झाली होती. त्यादिशेने तपास केल्यावर किरण साळुंखे, शंकर मोहिते, सचिन मोहिते व जयेश नाईकरे ( रा. बारापाटी, कमान, ता. खेड ) यांनी संगनमत करून राहुल मोहिते, याचा धारदार हत्यारांनी, त्याच्याच घरात खून केल्याचे उघड झाले.

त्यानंतर त्यांनी त्याचा मृतदेह कालव्यात टाकून दिला. म्हणून त्यांच्याविरोधात फौजदार भारत भोसले यांनी फिर्याद दिली. त्या चौघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

loading image
go to top