पुणे - मुंबई-बंगळुरू बाह्यवळण महामार्गावरील नवले पुलाच्या परिसरात वृद्ध महिला नाल्यात पडून वाहून गेल्याची घटना गुरुवारी रात्री अकरा वाजता घडली होती. शुक्रवारी दुपारी साडे चार वाजण्याच्या सुमारास घटनास्थळापासून दोन किलोमीटर अंतरावर महिलेचा मृतदेह आढळून आला.