Pune आंबेगाव तालुक्यातील अनोळखी पुरुषाचा मृतदेह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

dead body

Pune : आंबेगाव तालुक्यातील अनोळखी पुरुषाचा मृतदेह

पारगाव : लाखणगाव ता. आंबेगाव गावाच्या हद्दीत घोडनदीचे पात्रात गव्हाळीमळा काळूबाईच्या डोहाजवळ अंदाजे ३५ ते ४० वयाच्या अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे.

पारगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काल बुधवार (दि.12) रात्रौ आठ वाजण्याच्या सुमारास पांडूरंग झलके गव्हाळीमळा काळूबाईच्या डोहाजवळ नदीवर मोटार चालू करण्यासाठी गेले होते तेव्हा त्यांना कसला तरी वास येत असल्याने त्यांनी नदीपात्रात पाहिले असता त्यांना अज्ञात इसम पाण्यावर तरंगताना दिसला त्यांनी शिरीषकुमार कोंडीबा रोडे यांना मोबाईल करून माहिती दिली

श्री. रोडे यांनी पारगाव पोलिसांना घटनेची माहिती दिल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक लहूजी थाटे, पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब लोकरे यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन मृतदेह पाण्याच्या बाहेर काढून शवविच्छेदनासाठी मंचर उपजिल्हा रुग्णालयात पाठविला आहे. मृतदेह दोन ते तीन दिवसापासून पाण्यात असल्याने कुजलेल्या अवस्थेत आहे पोलिसांनी आकस्मित मयत म्हणून नोंद केली आहे.

अनोळखी इसम वय अंदाजे 35 ते 40 वर्षे वयाचे नाव पत्ता माहीत नाही त्याचे अंगावर जांभळे रंगाचा फुल बाह्याचा शर्ट व काळे रंगाची पँन्ट असून याबाबत आसपासच्या गावात एकांदि व्यक्ती हरवली असेल किंवा कोणाला काही माहिती असल्यास पारगाव पोलीस ठाण्यात