
आळेफाटा : आळेफाटा (ता. जुन्नर) येथे आज (ता. १२) सकाळी आळे गावच्या हद्दीत एका अंदाजे ६० वर्षे वयाच्या अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला आहे.
याबाबत आळेफाटा पोलीस ठाण्याच्या सूत्रांकडून समजलेल्या माहितीनुसार, आळेफाटा येथे आळे गावच्या हद्दीत अहमदनगर रस्त्यावरील पेट्रोल पंपाच्या बाजुला, आज (ता.१२) सकाळी स्थानिक ग्रामस्थांना एका अंदाजे ६० वर्षे वयाच्या महिलेचा मृतदेह आढळून आला. त्यांनी याची माहिती आळेफाटा पोलीसांना कळवली.
दरम्यान पोलीसांनी घटनास्थळी जाऊन रितसर पंचनामा केला असुन, सदर महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही. या महिलेचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी आळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आला आहे.
दरम्यान, गेल्या दोन दिवसांपूर्वीच आळेफाटा एसटी बसस्थानकाजवळ एका अज्ञात इसमाच्या डोक्यात सिमेंटचा ब्लॉक घालून खुन झाल्याची घटना घडली होती. दरम्यान पुढील तपास आळेफाटा पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस शिपाई विकास लोंढे करीत आहेत.
(संपादन : सागर डी. शेलार)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.