पुणे : मुठा नदीपात्रात उडी मारलेल्या तरुणाचा मृतदेह आढळला

The body of a young man who jumped into a riverbed was found pune
The body of a young man who jumped into a riverbed was found pune
Updated on

किरकटवाडी(पुणे) : खडकवासला धरणाच्या मागच्या बाजूला मुठा नदी पात्रात असलेल्या पुलाजवळ दारूच्या नशेत काल (ता. 2 सप्टेंबरला) उडी मारलेल्या सुरज शिवाजी भातकर (वय 30 रा. येरवडा) याचा मृतदेह पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी शोधला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सुरज व त्याचा मित्र अनिल नक्ताळ हे दोघे फिरण्यासाठी खडकवासला धरण परिसरात काल आले होते. दुपारी दोन ते चार वाजेपर्यंत दोघेही मुठा नदीपात्रातील खडकावर बसून मद्यप्राशन करत होते. सायंकाळी चार वाजेच्या दरम्यान सूरजने त्याचा मित्र अनिल याला घरगुती वादाचे खूप टेन्शन येत आहे असे दारुच्या नशेत भावनिक होऊन सांगण्यास सुरुवात केली. अनिलला काही कळण्याच्या आतच सुरज उभा राहिला आणि त्याने थेट मुठा नदीपात्रात उडी घेतली. खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात 1700 क्युसेकने विसर्ग सुरू असल्याने सुरज पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून जाऊ लागला. सूरजला वाचविण्यासाठी अनिलने ही पाण्यात उडी घेतली; परंतु पाण्याचा वेग जास्त असल्याने अनिलही वाहून जाऊ लागला. फिरण्यासाठी आलेल्या तरुणांनी अनिलला वाचवले परंतु सुरज वाहून गेला.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

काल रात्री उशीरापर्यंत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी अग्निशमन विभाग प्रमुख देवेंद्र पोटफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन केंद्रप्रमुख सुजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरजचा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु अंधार असल्याने व नदीपात्रामध्ये जास्त प्रमाणात पाणी असल्याने शोध घेण्यात अडथळे येत होते त्यामुळे रात्री उशिरा शोध थांबविण्यात आला. आज सकाळी लवकरच शोधकार्याला पुन्हा सुरुवात करण्यात आली. सकाळी साडेअकरा वाजेच्या दरम्यान खडकवासला धरणा मागील पुलापासून सुमारे पाचशे मीटर अंतरावर सुरजचा मृतदेह आढळला.

उत्तमनगर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनिल पंधरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अभिजित ढेरे हे मृतदेहाचा पंचनामा करण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास करण्यात येत आहे.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

 धरण परिसरातील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
दरम्यान सुरज भातकर याने केलेल्या आत्महत्येनंतर धरण परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. धरणा मागील झाडाझुडुपांमध्ये अनेक तरुण मद्यप्राशन करण्यासाठी किंवा इतर अंमली पदार्थांचे सेवन करण्यासाठी येतात. पुणे ग्रामीण पोलीस व पुणे शहर पोलीस यांच्यातील हद्दीच्या वादामध्ये हा भाग नेहमीच दुर्लक्षित राहिलेला आहे. धरणाची सुरक्षितता व अशा इतर घडणाऱ्या घटना या सर्वांच्या दृष्टीने धरण परिसरामध्ये सतत चोख पोलिस बंदोबस्त असणे अत्यंत आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com