मुळव्याधग्रस्त रुग्णावर शस्त्रक्रिया करणाऱ्या बोगस डॉक्‍टरला वाघोली येथून अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime

शासनमान्यता प्राप्त वैद्यकीय शिक्षणाची पदवी घेतलेली नसतानाही मुळव्याधग्रस्त रुग्णावर शस्त्रक्रिया करणाऱ्या एका बोगस डॉक्‍टरला वाघोली येथून अटक करण्यात आली.

मुळव्याधग्रस्त रुग्णावर शस्त्रक्रिया करणाऱ्या बोगस डॉक्‍टरला वाघोली येथून अटक

पुणे - शासनमान्यता प्राप्त वैद्यकीय शिक्षणाची पदवी घेतलेली नसतानाही मुळव्याधग्रस्त रुग्णावर शस्त्रक्रिया करणाऱ्या एका बोगस डॉक्‍टरला वाघोली येथून अटक करण्यात आली. राज्य सरकारचा आरोग्य विभाग, नॅशनल इंटिग्रेटेड मेडीकल असोसिएशन(निमा) यांनी बोगस डॉक्‍टरवर कारवाईचा बडगा उगरला. लोणीकंद पोलिसांनी आरोपीस अटक केली.

अरुणकुमार यश रॉय (जे.जे.नगर, वाघोली) असे अटक केलेल्या बोगस डॉक्‍टरचे नाव आहे. याप्रकरणी वाघोली प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.एन.एच.लोखंडे यांनी लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रॉय याचे वाघोली परिसरातील जे.जे. नगर येथे क्‍लिनीक आहे. मुळव्याधग्रस्त व्यक्ती संबंधित त्याच्याकडे उपचार करण्यासाठी जात होते. त्यावेळी रॉय याने शस्त्रक्रिया केलेल्या काही रुग्णांच्या शरिरातुन रक्तस्त्राव थांबत नसल्याने रुग्ण व त्यांचे नातेवाईकांनी घाबरून रुग्णालयात धाव घेतली होती. त्यानंतर हा प्रकार पुढे आली.

याप्रकरणी राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडेही तक्रारी दाखल झाल्या होत्या. या तक्रारींची दखल घेऊन वाघोली प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. एन. एच. लोखंडे, 'निमा'चे पुणे जिल्हाध्यक्ष डॉ. विनोद सातव, लोणीकंद पोलिसांनी गुरुवारी रॉय याच्या क्‍लिीनीकमध्ये छापा घातला. त्यावेळी रॉय व त्याची पत्नी तेथे आढळून आली. तसेच त्यांच्याकडे वैद्यकीय उपकरणे, औषधे व अन्य वैद्यकीय साहित्य आढळून आले. त्याच्याकडे वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी आवश्‍यक राज्य शासन प्राप्त वैद्यकीय शिक्षणाची कुठलीही पदवी नसल्याचे उघड झाले. असे असूनही तो रुग्णांच्या जीवाशी खेळत असल्याचे उघड झाले. त्यानुसार, लोणीकंद पोलिसांनी त्यास अटक केली.

'पश्‍चिम बंगालमधील व्यक्तींकडून शहरात वेगवेगळ्या ठिकाणी दवाखाने थाटून रुग्णांवर उपचार घेतले जात आहेत. मात्र काही रुग्णांना त्रास होऊ लागल्याच्या तक्रारी आमच्याकडे आल्या. त्यानुसार हि कारवाई केली आहे. यापुढेही हि कारवाई करण्यात येणार असून नागरीकांनी प्राथमिक आरोग्य केंद्र व नजीकच्या पोलिस ठाण्यात बोगस डॉक्‍टरविषयी माहिती द्यावी.'

- डॉ. विनोद सातव

Web Title: Bogus Doctor Operating On A Hemorrhoid Patient Was Arrested From Wagholi Crime

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top