बोलेरो पिकअपला पाठीमागून स्विफ्ट डिझायर गाडीची धडक; एक ठार, दोन जण गंभीर

मळद येथे महामार्गावर सोलापूरकडून पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर अपघात झाला.
Accident
AccidentSakal
Summary

मळद येथे महामार्गावर सोलापूरकडून पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर अपघात झाला.

कुरकुंभ - दौंड तालुक्यातील मळद येथे शुक्रवारी (ता. 7) सायंकाळी सहाच्या सुमारास पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याच्या भुयारी मार्गावर लोखंडी सुरक्षाकठडे बसणार्‍या कंत्राटदाराच्या उभ्या असलेल्या महेंद्र बोलेरो पिकअपला पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या मारुती स्विफ्ट डिझायर गाडीने धडक दिल्याने एक जण जागीच ठार झाला. तर दोन जण गंभीर जखमी झाले. हा अपघात रस्त्याच्याकडेला धोकादायकरित्या उभ्या केलेल्या पिकअप जीप चालकाच्या निष्काळजीपणामुळे घडल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.

मळद येथे महामार्गावर सोलापूरकडून पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर हा अपघात झाला. मळद येथील रेल्वे उड्डाण पुलाजवळील भुयारी मार्गावरील लोखंडी सुरक्षाकठडे बसविण्याचे दुरूस्तीचे काम करण्यात येत होते. हे काम संपून ठेकेदाराचे कामगार व पिकअप (एमएच. 42, एम. 4926) चालक रस्त्याच्याकडेला गाडी उभी करून चहा पिण्यासाठी गेले होते.

मात्र हे पिकअप रस्त्यावरून खाली लावण्याऐवजी कडेलाच उभे करून चहा प्यायला गेले. यावेळी पाठीमागून भरधाव वेगात जाणारी मारूती स्विफ्ट डिझायर (एमएच. 14, एफसी. 1748) गाडी पिकअपला पाठीमागून धडकली. या अपघातात स्विफ्टमधील एक जण जागीच ठार झाला. त्यामधील आणखी एक व पिकअपमधील एक कामगार असे दोघे जण गंभीर जखमी झाले. यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. अपघातात मृत व जखमी झालेले व्यक्तीची नावे व पत्ता समजू शकला नाही.

अपघातातील स्विफ्ट गाडी नगर जिल्हातील श्रीगोंदा तालुक्यातील असल्याचे समजते. जखमींना उपचारासाठी तातडीने दौंडमधील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात पिकअप जीपच्या चालकाच्या निष्काळजीपणामुळे घडल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. या निष्काळजीपणामुळे एकाला जिव गमवावा लागला तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर स्विफ्ट गाडीच्या पुढील बाजूचा चेदामेंदा झाला आहे. अपघातानंतर लोखंडी सुरक्षाकठडयाचे साहित्य महामार्गावर पसरले होते. त्यामुळे सोलापूर-पुणे लेनची वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती. अपघातातील गाडया व साहित्य बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत करण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com