Property Law: आई असेपर्यंत आजोबांच्या मिळकतीत हिस्सा नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निकाल
Bombay High Court: मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाने दिलेल्या महत्त्वपूर्ण निकालात आई हयात असताना नातवांना आजोबांच्या मालमत्तेत हिस्सा मागता येणार नसल्याचे स्पष्ट झाले असून आईला मिळालेली वडिलोपार्जित मालमत्ता तिची स्वकष्टार्जित मानली जाईल.
पुणे : आई हयात असेपर्यंत तिला तिच्या वडिलांकडून वारसा हक्काने आलेल्या मिळकतीत नातवांना हिस्सा मागता येणार नाही. तसेच, आईने ती हयात असताना त्या मिळकतीची विल्हेवाट लावली असेल; तर त्यावर मुले आक्षेप घेऊ शकत नाहीत.